Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘त्यांचे’ अश्लील चाळे जेव्हा कार्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुपवर सेंड होतात तेव्हा…
गुन्हेगारी

‘त्यांचे’ अश्लील चाळे जेव्हा कार्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुपवर सेंड होतात तेव्हा…

कार्यालयीन कारवाईकडे लागले लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

संगमनेरच्या कृषी विभागातील एका कर्मचाऱ्याच्या रंगेल लीला मंगळवारपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. कृषी पर्यवेक्षक असलेल्या या कर्मचाऱ्यांने आपल्याच खात्यातील एका महिलेचे अश्लील फोटो कार्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुपवर सेंड केले आणि या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या लीलांना तोंड फुटले आहे. कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून या कर्मचाऱ्यावर आता कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

नवीन नगर रोडच्या प्रशासकीय इमारतीमध्ये थेट वरच्या मजल्यावर कमी वर्दळीच्या ठिकाणी संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय आहे. थेट वरच्या मजल्यावर असल्याने या कार्यालयाशी फारसा कोणाचा संपर्क येत नाही. याच कार्यालयात गेल्या काही वर्षापासून एक कर्मचारी ठाण मांडून बसला आहे. कर्मचाऱ्यांचे आपल्याच विभागातील महिलेसोबत गेल्या अनेक वर्षापासून सूत जुळले आहे.

यातूनच त्यांच्या निर्माण झालेल्या अनैतिक संबंधाचे अनेक फोटो त्याने काढून ठेवले आहेत. त्यातील काही फोटो मंगळवारी सकाळी आपल्या कार्यालयाच्या ‘एस.बी.ओ.ए. स्पोर्टस’ नावाच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकली. विशेष म्हणजे या व्हाट्सअप ग्रुपचा ॲडमिन हा कर्मचारी स्वतःच असून या ग्रुपवर तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकारी, कर्मचारी असलेल्या पुरुष आणि महिलांचा समावेश आहे. आपल्या रंगेल सगळ्यांनी हा कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे.

यापूर्वी अनेकदा त्याच्याकडून असे प्रकार घडलेले आहेत. मात्र एवढे गंभीर प्रकार होऊन देखील संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कोणती कारवाई केली नाही. मंगळवारी पुन्हा या कर्मचाऱ्याने व्हाट्सअप ग्रुपवर आपल्या सोबत संबंध असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचे नको त्या अवस्थेतील आक्षेपार्ह नग्न फोटो टाकल्यानंतर काही वेळातच त्याने एकेकाला ग्रुपमधून रिमूव्ह केले असल्याचे बोलले जाते. मात्र या कर्मचाऱ्याच्या पूर्वकृत्यांची कल्पना असल्याने अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये त्याने पाठविलेल्या फोटोचे स्क्रीन शॉट काढून ठेवले होते.

यातूनच हे फोटो संबंधित कर्मचाऱ्यांच्या पत्नी पर्यंत पोहोचल्याने तिने या संदर्भात पतीला जाब विचारल्यावर तू आता म्हातारी झाली आहेस, माझ्या घरातून निघून जा, असे म्हणत तिला मारहाण केली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात येत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची भेट घेऊन झालेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. पोलिसांनी या कर्मचाऱ्यांच्या पत्नीची तक्रार नोंदवत या कर्मचाऱ्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील पोलिसांना या संदर्भात पत्र दिले असले तरी या कर्मचाऱ्यावर कारवाईचे अधिकार कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना असल्याने ते या संदर्भात काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,156
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.