Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन गुटखा विक्रेत्यांवरील पोलिसांच्या कारवाईत 57 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हेगारी

दोन गुटखा विक्रेत्यांवरील पोलिसांच्या कारवाईत 57 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

रफिक शेख आणि दिलीप शिंदे यांच्यावर कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/05/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)

संगमनेरमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची सर्रासपणे विक्री होत आहे. अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यावर झापड बांधल्याने शहर पोलिसांनी गुटखा विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे. दोघा विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत पोलिसांनी दोन दुचाकींसह सुमारे 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय येथील प्रमुख गुटखा विक्रेत्याला नगरच्या एलसीबीने ताब्यात घेतल्याची चर्चा आहे.

शहर पोलिसांनी रफिक पीरमोहम्मद शेख (वय 65 वर्ष, रा. अँग्लो उर्दू हायस्कूलसमोर, नाईकवाडपुरा, संगमनेर) आणि दिलीप सयाजी शिंदे (वय 34 वर्षे, युनिकॉर्न सोसायटी, गुंजाळवाडी, संगमनेर) या दोघा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. कारवाई पोलिसांनी त्यांच्याकडून दोन दुचाकी हस्तगत केल्या असून साधारणत: आठ हजाराचा गुटखा जप्त केला आहे.

पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना रफिक पीरमोहम्मद शेख हा आपल्या दुचाकीवरून गुटखा घेऊन समनापुरच्या दिशेने जात आहे अशी माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या गस्तीवरील पथकाला माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने समनापुर गणपतीजवळ सापळा लावला असता संशयित रफिक शेख हा आपल्या दुचाकीवरून समनापुरच्या दिशेने जात असताना त्याला पथकाने थांबविले. त्याच्याकडील पिशव्यांची झडती घेतली असता त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आली.

पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन मुकरे यांच्या फिर्यादीवरून रफिक शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी देवाचा मळा भागात केली. या कारवाईमध्ये दिलीप सहादू शिंदे हा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला व सुगंधी तंबाखू आपल्या कब्जात बाळगताना आढळून आला. त्याच्याकडील दुचाकीसह पोलिसांनी 25 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी या संदर्भात दोन्ही आरोपींविरोधात वेगवेगळ्या तक्रारीवरून भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 272, 273, 328 अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 59, 26(2), (IV) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 610
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.