Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माश्यांचा प्रादुर्भाव अन् आजारांची भीती! पोल्ट्री फार्मविरोधात आक्रमक पवित्रा, थेट तहसीलदारांना निवेदन

22/10/2026

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुष्काळी भागाला सुजलाम् सुफलाम् करणारे निळवंडे धरण!
शेती व सहकार

दुष्काळी भागाला सुजलाम् सुफलाम् करणारे निळवंडे धरण!

जिल्ह्यातील ६६ हजार २६६ हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/05/2023Updated:31/05/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३१ मे २०२३ रोजी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होत आहे. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण ‍विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. धरण लाभक्षेत्र परिसरातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून पाण्यासाठी असलेली प्रतिक्षा संपणार आहे. निळवंडे प्रकल्प नेमका काय आहे ? त्याच्या वैशिष्ट्याविषयी माहिती देणारा लेख…

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६२६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.

अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर निळवंडे धरण प्रकल्प साकार झाला आहे. निळवंडे धरणांचा पाणीसाठा २३६ दक्षलक्ष घनमीटर, ८.३२ टीएमसी ऐवढा आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा २२१.५० दक्षलक्ष घनमीटर ऐवढा आहे. धरणाची लांबी ५३३ मीटर आहे. सांडव्याची लांबी ७२ मीटर आहे. ५ सांडव्याद्वारे ३७०० क्यूमेक (घनमीटर प्रतिसेंकद) पाण्याचा विसर्ग होणार आहे. या धरण प्रकल्पासाठी एप्रिल २०२३ अखेर २३५१ कोटी रूपयांचा खर्च झाला आहे.

१४ जूलै १९७० रोजी प्रकल्पास ८ कोटी रूपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. २५ मार्च १९७७ रोजी १६ कोटी रूपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर २२ जून १९९३ रोजी २३४ कोटी रूपयांची दुसरी सु.प्र.मा मिळाली. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी ७६० कोटी रूपयांची तृतीय सु.प्र.मा.मिळाली. २१ जून २०१७ रोजी २३७० कोटी रूपयांची चतुर्थ सु.प्र.मा मिळाली आहे. तर ८ मार्च २०२३ रोजी ५१७७ कोटी रूपयांची पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पास मिळाली आहे.

निळवंडे प्रकल्पावर डावा कालवा, उजवा कालवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजना असे चार कालवे आहेत. डावा कालवा हा ८५ किलोमीटरचा असून या कालव्याच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेमधील १३, संगमनेर ४३, राहाता ३७, श्रीरामपूर ३, कोपरगाव ११ व सिन्नर (नाशिक जिल्हा) ६ असे एकूण ११३ गावांमधील ४३८६५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. उजवा कालवा हा ९७ किलोमीटरचा असून या कालव्याच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मधील ११, संगमनेर ३७ व राहूरी २१ असे एकूण ६९ गावांमधील २०३९५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अकोले तालुक्यातील उच्चस्तरीय पाईप कालव्याद्वारे २३२८ हेक्टर क्षेत्र व जलाशयावरील उपसा सिंचन योजना २२९० हेक्टर असून असे एकूण ६८८७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

भूसंपादन सद्यस्थिती : – धरणाच्या बुडीत क्षेत्रासाठी लागणारे १३१७.३५ हेक्टर क्षेत्र (१०० टक्के) ताब्यात आहे. तसेच कालव्यासाठी एकूण संपादन करावयाचे क्षेत्र १४२७.३६ हेक्टर आहे, ताब्यातील क्षेत्र १४२४.०९ हेक्टर आहे व संपादन करावयाचे उर्वरित क्षेत्र ३.२७ हेक्टर आहे. कालव्यासाठी ३.२७ हेक्टर क्षेत्र संपादनाची कार्यवाही प्रगतीत आहे. ऑगस्ट २०२३ अखेर सर्व भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशी माहिती या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता यांनी दिली आहे.

पुनर्वसन सद्यस्थिती : – ऊर्ध्व प्रवरा (निळवंडे 2) प्रकल्पामुळे एक गाव व एक वाडी पूर्णतः व 12 गावे अंशतः बाधित होत आहेत. बाधित झालेल्या गावांमधील लोकांचे पुनर्वसन पूर्ण झालेले आहे.

असा हा बहुउद्देशीय निळवंडे धरण प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यांतील दुष्काळी व जिरायती भागांसाठी जीवनदायी ठरणार आहे. यात यत्किंचित शंका नाही.

संकलन – सुरेश पाटील, माहिती अधिकारी, उप माहिती कार्यालय, शिर्डी

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,144
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

माश्यांचा प्रादुर्भाव अन् आजारांची भीती! पोल्ट्री फार्मविरोधात आक्रमक पवित्रा, थेट तहसीलदारांना निवेदन

By Annant Ppangarkar22/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राहता तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील वस्तीजवळ सुरू असलेल्या पोल्ट्री फार्ममुळे पसरणाऱ्या…

संगमनेरमधील शासकीय आणि आरक्षित जमिनीवरील अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय हालचालींना वेग, मोजणीसह चौकशीचे आदेश

22/10/2026

लोहारे येथील आवजीनाथ बाबा देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार; आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते २० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

22/10/2026

आज गुरुवार, २२ ऑक्टोंबर — आजच्या दिवसाचे राशिभविष्य जाणून घ्या

22/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.