Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात बनावट डॉक्टरवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरात बनावट डॉक्टरवर गुन्हा दाखल

संगमनेर आतापर्यंत आढळले अनेक मुन्नाभाई एमबीबीएस
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – वैद्यकीय व्यवसायासाठीचे परवानगी नसताना देखील रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बनावट डॉक्टरवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद आयुब शेख, (रा. नवरंग कॉम्प्लेक्स, बागवानपुरा, संगमनेर) असे या बनावट डॉक्टरचे नाव आहे. विशेष म्हणजे संगमनेर शहरात या डॉक्टरचा दवाखाना राजरोसपणे सुरू होता.

संगमनेर नगर परिषदेच्या कॉटेज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी प्रतिभा कचकुरे यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अधिनियमाचे कलम 33 व 37 प्रमाणे संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष राहुल वाघ यांनी संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याचे आदेश सचिव प्रतिभा कचकुरे यांना दिले होते.

या आदेशावरून नगरपरिषद रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीच्या सचिव प्रतिभा कचकुरे यांनी या संदर्भात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जावेद शेख याच्या रुग्णालयाची व त्याच्याकडील कागदपत्रांची तपासणी केली होती. तपासणी दरम्यान त्यांना शेख यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठीची कोणतेही पदवी आढळून आली नाही. तसेच संबंधित डॉक्टर देखील या संदर्भात कोणतेही कागदपत्र सादर करू शकला नाही.

भेटी दरम्यान संबंधित डॉक्टरकडे बोगस डॉक्टर शोध समितीच्या सचिवांनी त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या औषध उपचाराविषयी चौकशी केली असता डॉक्टरने नैसर्गिक उपचारात जडीबुटीचा वापर करत असल्याचे सांगितले. क्लिनिक साठी वैद्यकीय व्यवसायातील आवश्यक नोंदणी पत्रही या डॉक्टरकडे आढळून आले नाही. जी कागदपत्रे डॉक्टरने सादर केले त्यामध्ये संबंधित कोर्स हे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून केल्याचे आढळून आले नाही. तसेच त्याच्याकडील नॅचरोपॅथी व योग्य सायन्स प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता योग व निसर्गोपचार व्यावसायिक म्हणून अधिकृत व्यवसाय करण्यास ते पात्र असल्याचे आढळून आले नाही. संबंधित डॉक्टर आपल्या नावापुढे डॉक्टर किंवा तस्सम नावाची पदवी लावू शकत नाही.

तपासणी दरम्यान शेख यांनी त्यांच्या क्लिनिक वर जीवनाने आयुर्वेदिक व निसर्गोपचार केंद्र असा फलक लावल्याचे आढळून आले. तसेच क्लिनिक मध्ये त्यांनी तयार केलेले हमसफर हर्बल मुतखडा आयुर्वेदिक औषध आढळून आले. याशिवाय कोणतेही नाव नसलेले गोळ्यांचे डबे आणि चुरणाचे डबे आढळून आले होते. शेख यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लावून संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, हाता-पायाला मुंग्या येणे, गुप्तरोग असे विविध रोग बरे करा. अशी देखील जाहिरात केल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले होते. त्यामुळे संबंधित डॉक्टरने त्यांच्याकडील प्रमाणपत्रानुसार व्यवसायाची नोंद न करता डॉक्टर ही पदवी लावून वैद्यकीय अधिनियमाच्या तरतुदींचा भंग केल्याने त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली.

संगमनेर शहर व तालुक्यामध्ये यापूर्वी बोगस डॉक्टर शोध समितीच्या तपासणीत अनेक बनावट मुन्नाभाई आढळून आले आहेत. त्यात गुरुवारी आणखी एका डॉक्टरची भर पडली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक योगिता महाले पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 968
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.