Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मंगळवारी सकल हिंदू समाजाचा संगमनेरात भगवा मोर्चा; स्वयंस्फूर्तीने बंद देखील पाळणार
आंदोलन

मंगळवारी सकल हिंदू समाजाचा संगमनेरात भगवा मोर्चा; स्वयंस्फूर्तीने बंद देखील पाळणार

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – मंगळवारी (6 जून) काढण्यात येणाऱ्या सकल हिंदू समाज भगवा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून ‘मोर्चा काढा मात्र सर्वतोपरी काळजी घ्या’, असे आवाहन करत मंगळवारच्या मोर्चाला प्रशासनाने काही अटींवर परवानगी दिली. तसेच स्वयंस्फूर्तीने शहर व तालुक्यातील बहुतांशी गावात बंद देखील पाळला जाणार आहे.

महाराष्ट्रात हिंदूंच्या सणांवर होणारे हल्ले, दिल्लीत साक्षीची जिहादींकडून चाकूने अनेक वार करून केलेली हत्या व जोर्वे गावातील ८ हिंदू तरुणांवर तलवारीने झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ ६ जुन रोजी होणाऱ्या सकल हिंदु समाज ‘भगवा मोर्चा व संगमनेर शहर तालुका बंद”च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बोलवली बैठक होती. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदी अधिकारी उपस्थित होते.

मोर्चा संदर्भात पोलीस उपाधीक्षक वाघचौरे यांनी मोर्चाच्या आयोजकांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मोठ्या संख्येने लोक मोर्चात सहभागी होणार असल्याने त्या अनुषंगाने काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. मोर्च्यामुळे कायदा सुव्यवस्था निर्माण होवू नये, असे नियोजन करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी यावेळी दिल्या.

मोर्चा व बंद संदर्भातील संयोजकांचे नियोजन बैठकीत समजावून घेण्यात आले. तालुक्यातील येणाऱ्या हजारो बंधू-भगिनींची येण्या-जाण्याची व्यवस्था, पार्किंग, पिण्याचे पाणी व नियोजनाची माहिती आयोजकांनी दिली.

मंगळवारी सकाळी ९ वाजता मोर्चा नगर परिषदेसमोरील लाल बहादूर शास्त्री चौकातून निघणार असून तो बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यद बाबा चौक, मेनरोड, चावडी मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून नवीन नगर रस्त्यावरील उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी कार्यालयासमोर येणार आहे. तेथे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर व कोल्हेवाडी गावचे जावई, सुदर्शन नॅशनल न्युजचे संपादक सुरेश चव्हाणके यांचे मार्गदर्शन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

बैठकीस विशाल वाकचौरे, मयुर शेलार, योगेश सुर्यवंशी, कुलदीप ठाकुर, प्रशांत बेल्हेकर, सचिन कानकाटे, विजयकुमार पटाडे, सोमनाथ काळे, रमेश काळे, कैलास वाकचौरे, ज्ञानेश्वर थोरात, सुरेश कालडा, अश्विन बेल्हेकर, किशोर गुप्ता, दिपेश ताटकर आदींसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 686
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.