Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खासदार राऊत यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची (ठाकरे) मागणी; पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन
आंदोलन

खासदार राऊत यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची (ठाकरे) मागणी; पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/06/2023Updated:05/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याप्रकरणी शिवसेनेने (शिंदे गट) विना परवानगी केलेल्या आंदोलनाबद्दल आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने (ठाकरे गट) केली आहे. या संदर्भात सोमवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवानराव मथुरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

रविवारी शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख रमेश काळे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बस स्थानकासमोर आंदोलन करत राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. राऊत यांनी शिवसेनेविषयी (शिंदे गट) वाईट वक्तव्य केल्यास शिवसेना गप्प बसणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावरून स्थानिक शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, संपर्कप्रमुख नरेश माळवे, युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ आदींच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट घेत शिवसेना (शिंदे गट) केलेले आंदोलन विनापरवाना असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

शिवसेना पक्षाचे विद्यमान खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला विना परवानगी जोडेमारो आंदोलन केले व त्यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीच्या घोषणा देऊन शिव्या देण्यात आल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची बदनामी होईल या हेतूने गर्दी जमा करून कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली म्हणून काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

संजय राऊत नेहमी शिवसेना (ठाकरे) पक्षाची बाजू निर्भीडपणे मांडत असतात ते शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत. त्यांच्या विरोधात अशा प्रकारचं आंदोलन करणाऱ्याला पक्षाचे पदाधिकारी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे देखील म्हटले आहे.

सदर निवेदनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख अमरभाऊ कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, संपर्कप्रमुख नरेश माळवे, युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, युवा सेनेचे फैसल सय्यद, सचिन साळवे, अनिल खुळे, सलमान शेख, शोएब शेख, तिलक गांधी, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, अजिज मोमीन, दीपक वन्नम, सचिव सुदर्शन इटप, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, अशोक बडे, फरोज कतारी आदी शिवसैनिकांच्या सह्या आहेत.

शिवसेना ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेल्या या मागणी संदर्भात पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 940
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.