Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बारा किलो गांजासह संगमनेरचे दोघे पकडले; जिल्ह्याच्या सरहद्दीवर झाली कारवाई
गुन्हेगारी

बारा किलो गांजासह संगमनेरचे दोघे पकडले; जिल्ह्याच्या सरहद्दीवर झाली कारवाई

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

गेल्या काही वर्षात संगमनेर गांजा विक्रीचे प्रमुख केंद्र म्हणून समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी नगर-कल्याण हायवेवर ओतूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका बोलेरो कारमधून गांजाची वाहतूक करताना संगमनेरातील दोघांना पकडले आहे. यातून गांजाचे पुन्हा एकदा संगमनेर कनेक्शन समोर आले.

सिद्धार्थ किशोर टेकाडे (वय ३१ वर्ष, रा. वाडेकर गल्ली, संगमनेर) आणि संतोष दत्तात्रय जऱ्हाड (वय ३७ वर्ष, रा. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाजवळ, संगमनेर) अशी पोलिसांनी गांजासह पकडलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

नगरच्या दिशेकडून कल्याणकडे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती ओतूर पोलिसांना समजली होती. आळेफाटा पास झाल्यानंतर संशयित बोलेरो कल्याणच्या दिशेने मार्गस्थ झाल्याची पक्की माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नरचे पोलीस उपाधीक्षक रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, उपनिरीक्षक आकाश शेळके यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश पठारे, धनंजय पालवे, नरेंद्र गोराणे, देविदास खेडकर आदींनी संशयित बोलेरो पकडण्यासाठी सापळा रचला.

बोलेरो घेऊन दोघेजण कल्याणच्या दिशेने जात असताना नगर कल्याण हायवेवर कातकरे वस्तीजवळ बोलेरो आले असता पोलिसांनी तिला थांबण्याचा इशारा केला. बोलेरो थांबवत पोलिसांनी तिची तपासणी केली असता तिच्यामध्ये पोलिसांना गांजा आढळून आला. गांजाचे मोजमाप केले असता बारा किलो गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 791
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.