Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील 45019 शेतकऱ्यांना 7 कोटी 72 लाखाचा डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून फायदा
शेती व सहकार

संगमनेर तालुक्यातील 45019 शेतकऱ्यांना 7 कोटी 72 लाखाचा डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून फायदा

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ; आमदार बाळासाहेब थोरात यांचा पुढाकार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, माजी कृषी व महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याने कायम शंभर टक्के बँकेची वसुली दिली आहे. शून्य टक्के व्याज देण्याच्या जिल्हा बँकेच्या निर्णयातून संगमनेर तालुक्यातील नियमित कर्ज फेड करणाऱ्या 45019 सभासदांना राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून 7 कोटी 72 लाख 21 हजार 749 रू व्याज सवलत मिळाली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे व तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात यांनी दिली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची आदर्श परंपरा लाभलेल्या संगमनेर तालुक्याने जिल्हा बँकेची कायम शंभर टक्के वसुली दिली आहे. आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा बँकेने तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य व केंद्र शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून 7 कोटी 72 लाख 21 हजार 749 रुपये सवलत मिळाली आहे.

सन 2020-21 वर्षात 21 हजार 242 सभासदांना 3 कोटी 13 लाख रुपये, तर सन 2021-22 मध्ये 23 हजार 276 सभासदांना 4 कोटी 52 लाख 92 हजार 425 रुपये व्याज सवलत मिळाली आहे. तर विशेष घटक योजनेअंतर्गत 2020-21 मध्ये 501 सभासदांना 6 लाख 68 हजार रुपयांची व्याज सवलत मिळाली आहे. अशी तालुक्यात 2020-21 व 2021-22 मिळून 45019 सभासदांना 7 कोटी 72 लाख 21 हजार 749 रुपयांची व्याज सवलत मिळाली.

आमदार थोरात यांच्याकडून शेतकऱ्यांना नियमित कर्ज फेड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. याकरता जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संचालक गणपतराव सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात, वसुली अधिकारी उल्हास शिंदे, सचिव संघटनेचे प्रकाश कडलग आदींनी गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.

यासाठी सर्व शाखा अधिकारी व सोसायट्यांचे सेक्रेटरी, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व शेतकी संघ यांचे ही सहकार्य लाभले आहे. ही व्याज सवलत मिळाल्यामुळे तालुक्यातील नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 687
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका…

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.