Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शरद पवारांना धमकी देणाऱ्या सागर बर्वेला एक दिवसाची पोलीस कोठडी
गुन्हेगारी

शरद पवारांना धमकी देणाऱ्या सागर बर्वेला एक दिवसाची पोलीस कोठडी

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/06/2023No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणी अटक केलेल्या सागर बर्वे याला मुंबईच्या महादंडाधिकारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी बर्वे यांच्याकडून हस्तगत केलेला लॅपटॉप आणि मोबाईल यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची चौकशी करावयाची आहे. तसेच या प्रकरणात अन्य संशयित आरोपींचा सागर बर्वे यांच्याशी काही संबंध आहे का? याचा देखील तपास करावयाचा आहे.

आरोपीने आक्षपार्ह टिपणी करून दोन समूहात किंवा समाजात विविध समूहामध्ये कलह निर्माण केल्याच्या आरोपामुळे तपास होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगत पोलिसांकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. मात्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली.

आरोपी सागर बर्वे यांच्यावतीने ॲड. सुशीला गुप्ता यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. युक्तिवाद करताना गुप्ता यांनी म्हटले की, सागर बर्वेने ज्या सोशल मीडियावरील प्रोफाइलवरून धमकी दिली, त्या सोशल मीडियावरील प्रोफाइल डिलीट केले आहे.

तसेच त्याच्या विरोधात दाखल गुन्ह्यातील कलम 504 व 506 हे जामीनपात्र आहेत. आत्तापर्यंतच्या पोलीस तपासात सागर बर्वेने सर्व माहिती दिली असून त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे कोठडीची गरज काय असा प्रश्न उपस्थित करीत पोलीस कोठडीला विरोध दर्शविला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 397
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जवळेकडलग येथील अकरा वर्षीय बालक कृष्णा वसंत पवार याचा…

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

सत्याचा आवाज, लेखणीचा पहारेकरी – ज्येष्ठ पत्रकार अनंत पांगारकर यांचा आंबेडकरी चळवळीच्यावतीने हृद्य सत्कार

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.