Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध गुन्हे दाखल करा, काँग्रेसची मागणी… संगमनेर तालुक्यात खबऱ्याविरुद्ध तीव्र संतापाची लाट
आंदोलन

अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध गुन्हे दाखल करा, काँग्रेसची मागणी… संगमनेर तालुक्यात खबऱ्याविरुद्ध तीव्र संतापाची लाट

आमदार थोरात यांच्या निवासस्थानाजवळ भाजप कार्यकर्त्यांनी केले धरणे आंदोलन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा विकास व शांतता काहींना पहावत नसल्याने जातीय तेढ निर्माण करून समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जमावबंदीचा आदेश मोडून आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेची छेडछाड करण्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उमटली असून या सर्व लोकांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावे, अशी मागणी संगमनेरकर व काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

राज्यघटना व सर्वधर्मसमभाव हा विचार जोपासत पुरोगामी व वारकरी संप्रदायाचे पाईक असलेल्या आमदार थोरात यांनी संगमनेरमध्ये बंधुभाव व सामंजस्याचे वातावरण राहावे, यासाठी सातत्याने काम केले आहे. मात्र काही समाज विघातक शक्तींनी याला जातीयतेचे रूप देत स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा निंदनीय प्रकार केला आहे.

सकल हिंदू समाजाच्या नावावर अवघ्या तीस-पस्तीस खबऱ्यांचे काम करणाऱ्या लोकांनी आज स्टंटबाजीचे आंदोलन केले आणि यावेळी प्रसिद्धीसाठी सुसंस्कृत व संयमी नेते आमदार थोरात यांच्या फोटोची छेडछाड करून काळे लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेची वार्ता समजताच तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली. गावागावातील कार्यकर्ते यशोधन कार्यालयात दाखल झाले. माजी आमदार डॉ. तांबे, डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, विश्वास मुर्तडक काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले.

डॉ तांबे म्हणाले, सुसंस्कृत राजकारण हे आपल्या तालुक्याची परंपरा आहे. काही लोकांना हे पहावत नाही. विकास कामात कोणतेही योगदान न देणारे लोक जातीय तेढ निर्माण करू पाहत आहे. संगमनेरची शांतता व सुव्यवस्था बिघडवू पाहत आहेत. हे अगदी ठराविक लोक आहेत. अशा वाईट प्रवृत्तींचा तीव्र निषेध सर्वांनी केला पाहिजे. मात्र सर्वांनी संयम राखावा असे आवाहन केले.

पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना या निवेदनाची प्रत बाबा ओहोळ, विश्वास मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, रामहरी कातोरे, अजय फटांगरे यांच्या उपस्थितीत देण्यात आली.

का केली कारवाईची मागणी…सकल हिंदू समाजाचा आमदार बाळासाहेब थोरात यांनी अपमान केल्याचा आरोप करत संगमनेरमध्ये आमदार थोरात यांच्या निवासस्थानाजवळ जाणता राजा मैदान येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी धरणे आंदोलन करीत थोरात यांचा निषेध करत घोषणाबाजी केली. यावेळी थोरात यांच्या प्रतिमेशी छेडछाड करत काळे फासण्याचा देखील प्रकार करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 795
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी…

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.