Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महसूल मंत्री विखेंचे घरच्याच ‘गणेश’ निवडणुकीत पानिपत; एका जागेचा अपवाद वगळता थोरात-कोल्हे यांचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी
शेती व सहकार

महसूल मंत्री विखेंचे घरच्याच ‘गणेश’ निवडणुकीत पानिपत; एका जागेचा अपवाद वगळता थोरात-कोल्हे यांचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी

थोरात-कोल्हे गटाला 18 तर विखे गटाला फक्त 1 जागा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 19, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विखे गटाची सत्ता उलथून सभासदांनी केले परिवर्तन

महाराष्ट्र संवाद न्यूज 

राहाता – राहाता तालुक्याची कामधेनु असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर गणेश परिसरातील सभासदांनी विश्वास ठेवून श्री गणेश परिवर्तन पॅनलचे 18 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय केले असून विखे गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

राज्यभराचे लक्ष लागलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी उठली होती. काँग्रेस पक्षाचे नेते व सहकारातील आदर्श नेतृत्व आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रथमच गणेशच्या निवडणुकीत लक्ष घातले. युवा नेतृत्व विवेकभैय्या कोल्हे व आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली गणेश परिवर्तन पॅनेलने सत्ताधारी विखे गटाला प्रचारातच घाम फोडला होता.

आमदार थोरात यांच्या नेतृत्वावर सभासदांनी मोठा विश्वास ठेवला असून विखे गटाचे पानिपत केले आहे. सकाळपासूनच मतमोजणीवर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. थोरात-कोल्हे गटाच्या उमेदवारांच्या विजयाची आघाडी होताच सर्वत्र गुलाबाची उधळण सुरू झाली. ढोल ताशांचा गजर व आमदार बाळासाहेब थोरात जिंदाबादच्या घोषणा देण्यात आला.

सत्ताधारी विखे गटाला सभासदांनी यावेळी मोठी चपराक दिली असून सहकारातून समृद्धी निर्माण करणाऱ्या संगमनेर व संजीवनी पॅटर्न सभासदांनी कौल दिला आहे.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे:- 

श्री गणेश परिवर्तन पॅनल कडून ऊस उत्पादक संघातून शिर्डी गटामधून डांगे बाबासाहेब दादा व दंडवते विजय भानुदास, 

राहता गटातून माजी चेअरमन ॲड. नारायणराव ज्ञानेश्वर कारले, गंगाधर पांडुरंग डांगे व संपत कचरू हिंगे,

अस्तगाव गटातून गोरडे महेंद्र चांगदेव, चोळके बाळासाहेब पुंडलिक व नळे नानासाहेब काशिनाथ, 

वाकडी गटातून फोपसे अरुंधती अरविंद, लहारे सुधीर वसंतराव व शेळके विष्णुपंत शंकर,

पुणतांबा गटातून गाढवे अनिल सोपान, चौधरी संपत नाथाजी 

इतर मागासवर्गीय मतदार संघातून टिळेकर अनिल राजाराम 

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून कापसे अलेश शांतवन, 

भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून सातव मधुकर यशवंतराव, 

महिला प्रतिनिधी मतदार संघातून गोंदकर शोभाताई एकनाथ, धनवटे कमलबाई पुंडलिक हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. 

तर सहकारी संस्थांमधून चोळके ज्ञानदेव बाजीराव या विखे गटाच्या एकमेव उमेदवाराचा विजय झाला आहे.

विजयी उमेदवारांचे काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे, आमदार निलेश लंके, आमदार आशुतोष काळे, डॉ सुधीर तांबे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बिपिन कोल्हे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,657
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना: वर्षभरात १३४ प्रकरणे प्रलंबित, जिल्ह्यात २.६५ कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा

May 26, 2026

संगमनेरला हक्काचे पाणी आणि ११ तास वीज मिळालीच पाहिजे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

May 18, 2026

राजहंसच्या ‘मिशन ५० लिटर’मुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती; पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांचे प्रतिपादन

March 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक…

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.