Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अन्यायकारक अतिक्रमण मोहीम थांबविण्याची शिवसेनेची (ठाकरे) मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी; विस्थापितांची पर्यायी व्यवस्था करा: शहरप्रमुख अमर कतारी
आंदोलन

अन्यायकारक अतिक्रमण मोहीम थांबविण्याची शिवसेनेची (ठाकरे) मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी; विस्थापितांची पर्यायी व्यवस्था करा: शहरप्रमुख अमर कतारी

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 22, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेरमधील व्यावसायिकांची अतिक्रमणे चुकीच्या व अन्यायकारक पद्धतीने हटविली जात असून ही मोहीम थांबविण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

एका वादाच्या घटनेचा सूड म्हणून लघु व्यावसायिक, भाजीपाला, फळ विक्रेते, किरकोळ विक्रेते, टपरीधारक, स्टॉल धारक, धान्य विक्रेते, शेतकरी यांच्या विरोधात होत असलेल्या या अन्यायकारक मोहिमेबद्दल शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात गुरुवारी मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देत ही मागणी केली आहे.

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेच्या अतिक्रमण मोहिमेमुळे या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षापेक्षा जास्त काळ सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे अनेक लोक कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे, व्यवसायात तोटा झाला आहे, अशातच पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात असून यात सर्वसामान्य व्यावसायिकांचा भाजीपाला विक्रेत्यांचा व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा विचार केलेला दिसत नाही.

संगमनेरमध्ये काही लोकांची भांडणे झाली याचा परिणाम संगमनेर शहरातील बाजारपेठेवर देखील झाला आहे. याचा सर्वाधिक फटका अतिक्रमण धारकांना बसला असून ज्या ठिकाणी वाद झाले त्या ठिकाणची अतिक्रमणे काढणे गरजेचे असल्याने आपण तशी कारवाईदेखील केली आहे. अतिक्रमणे हटविण्यास आमचा विरोध नसून या व्यावसायिकांचा कायमचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी त्यांची काहीतरी व्यवस्था करून देणे आवश्यक आहे.

या संदर्भात पालिकेने नियमावली आखून देत त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर निश्चित कारवाई करावी. या अनुषंगाने येत्या चार दिवसात योग्य निर्णय झाला नाही तर संगमनेर तालुका शिवसेना युवा सेना महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना टपरीधारक गाळेधारक फळभाजी विक्रेते छोटे स्टॉल वाले संगमनेर नगर परिषदेत ठिय्या आंदोलन, उपोषण करतील असाही इशारा अमर कतारी यांनी दिला आहे.

तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, दीपक साळुंखे, सुदर्शन इटप आदींनी यावेळी सूचना केल्या. शिवसेनेच्या शिष्टमंडळात दिव्यांग सेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विजय सातपुते, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, वेणुगोपाल लाहोटी, दीपक वन्नम, मुस्लिम मावळा अजीज मोमीन, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, उपतालुकाप्रमुख वैशाली वडतल्ले, शहर प्रमुख संगीता गायकवाड, युवा सेनेचे अक्षय बिल्लाडे, अमोल डुकरे यांच्यासह किरकोळ व्यावसायिक आदी उपस्थित होते.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 727
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान राडा: पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधूर, परिसरात कलम १६३ लागू

July 20, 2026

आंदोलकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी; प्रकाश आंबेडकर यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका

July 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

By अनंत पांगारकरJuly 21, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली:  जंतर मंतर मैदानावर सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने संगमनेरात शेतकऱ्यांचा दीड तासांचा महामार्ग रोको मागे शासकीय बफर स्टॉकमधून युरिया मिळताच आंदोलन स्थगनावर शिक्कामोर्तब; लिंकिंग आणि ढिसाळ नियोजनावरून महायुती सरकारवर कडाडून टीका

July 21, 2026

संगमनेरमधील ‘मेडीकव्हर’चा काळा धंदा चव्हाट्यावर! महात्मा फुले योजनेच्या नावाखाली लाच मागणारे ‘रॅकेट’ लाचलुचपतच्या जाळ्यात, दोघांवर गुन्हा दाखल!

July 21, 2026

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.