Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

June 6, 2026

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नव्या संचालक मंडळाच्या माध्यमातून गणेशला पुन्हा गत वैभव मिळेल; आमदार बाळासाहेब थोरात
शेती व सहकार

नव्या संचालक मंडळाच्या माध्यमातून गणेशला पुन्हा गत वैभव मिळेल; आमदार बाळासाहेब थोरात

थोरात कारखान्यावर विवेक कोल्हेंसह नव्या संचालकांचा सत्कार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 23, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

गेल्या आठ वर्षापासून गणेश कारखान्याची प्रगती थांबल्याने ऊस उत्पादकांचे हाल होत होते. गणेश साखर कारखाना हा राहाता तालुक्याची कामधेनू आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सभासदांनी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर हा कारखाना संगमनेर व संजीवनीप्रमाणे चालवून नवे संचालक मंडळ गणेशला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देतील, असा विश्वास काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला

गणेश कारखान्याच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर करण्यात आला. यावेळी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ. एकनाथ गोंदकर, गणेशचे संचालक ॲड .नारायणराव कारले, बाबासाहेब कारले, विजय दंडवते, गंगाधर डांगे, संपत हिंगे, महेंद्र गोरडे, बाळासाहेब शेळके, नानासाहेब नळे, सुधीर लहारे, विष्णुपंत शेळके, अनिल गाढवे, संपत चौधरी, अनिल टिळेकर, मधुकर सातव, आलेश कापसे, सुधाकर जाधव, शोभा गोंदकर, कमलताई धनवटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, गणेश परिसरातील सभासदांनी निवडणुकीत गणेश परिवर्तन पॅनलवर मोठा विश्वास दाखवला. नवीन संचालक मंडळ हे जुन्या नव्यांचा मेळ असून कार्यक्षेत्रातील समस्यांची जाणीव असणारे आहे. उत्तम व्यवस्थापनाबरोबर सभासदांना चांगला भाव देणे व कारखान्याला पुन्हा वैभव प्राप्त करून देणे यासाठी सर्व संचालकांनी काम करावे.

राहाता तालुका हा पूर्वी वैभवशाली व समृद्ध तालुका होता. मात्र अनेक दिवसांपासून या तालुक्याची प्रगती थांबली आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. गणेश परिसरातील ऊस उत्पादक नेहमी संगमनेर व संजीवनीकडे ऊस द्यावा, यासाठी आग्रही असायचे. आता या उसाचे गणेश कारखान्यातच गाळप केले जाणार असून हा कारखाना पुन्हा आपला सुवर्णकाळ पाहिल असा विश्वासही व्यक्त केला

विवेक कोल्हे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात हे राज्याच्या सहकारातील अत्यंत आदर्शवत व्यक्तिमत्व आहे. सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे यांच्या विचारांवर गणेश कारखाना सक्षमपणे चालवला जाईल.

उपस्थित संचालकांनी मनोगत व्यक्त केले. आभार बाबा ओहोळ यांनी मानले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 816
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना: वर्षभरात १३४ प्रकरणे प्रलंबित, जिल्ह्यात २.६५ कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा

May 26, 2026

संगमनेरला हक्काचे पाणी आणि ११ तास वीज मिळालीच पाहिजे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

May 18, 2026

राजहंसच्या ‘मिशन ५० लिटर’मुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती; पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांचे प्रतिपादन

March 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

By अनंत पांगारकरJune 6, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक…

अपघातात निमगाव टेंभी येथील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

June 6, 2026

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

June 6, 2026

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

June 6, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.