Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेवगाव हत्याकांडातील आरोपी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
गुन्हेगारी

शेवगाव हत्याकांडातील आरोपी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चोरीच्या उद्देशाने केला खून आरोपीने दिली कबुली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/06/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – शेवगाव येथील आडत व्यापारी व त्यांच्या भाऊजयीचा चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या आरोपीला पकडण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोक्का, खुनासह दरोडा, खुनासह जबरी चोरी, चोरीच्या उद्देशाने खून करणे अशा स्वरूपाच्या सात गंभीर गुन्ह्याच्या नोंदी आहेत. खेडकर टाबर चव्हाण असे या आरोपीचे नाव आहे.

शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शेवगावमधील मारवाड गल्लीतील आडत व्यापारी गोपीकिसन गंगाबिसन बलदवा यांच्यासह त्यांच्या भावजयी पुष्पा हरिकिसन बलदवा यांची हत्या करून 4 लाख 95 हजार रुपये किमतीचे दागिने व रोकड चोरुन नेण्यात आली होती. यासंदर्भात सुनिता गोपीकिसन बलदवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात भादवि कलम 302, 397, 307, 460 प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह तपास पथके नेमली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, हेमंत थोरात, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण, दत्तात्रय हिगडे, अतुल लोटके, विजय विटेकर, दत्तात्रय गव्हाणे, बापूसाहेब फोलाने, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोंढे, जालिंदर माने, संदीप दरंदले, संदीप चव्हाण, फुरखान शेख, रवींद्र घुंगासे, अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाट, प्रशांत राठोड, संदीप पवार, उमाकांत गावडे, भरत बुधवंत, अरुण मोरे यांच्यासह शेवगाव पोलीस ठाण्यातील बाप्पा धाकतोडे यांची तीन वेगवेगळी पथके आरोपीचा शोध घेत होती.

सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेणाऱ्या पोलीस पथकाला सीसीटीव्ही मधील संशयित आरोपी खेडकर चव्हाण हा बिडकीन ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथे त्याच्या गावी असल्याची माहिती मिळाली. पथकाने छत्रपती संभाजी नगरच्या सानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेत बिडकीन गाठले. तेथे गावात फिरत असताना पथकाने त्याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने देण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,115
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.