महाराष्ट्र संवाद न्यूज
पंढरपूर – गेल्या 35 वर्षांपासून देवगड येथील भास्करगिरी महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील भाऊसाहेब मोहनीनाथ काळे आणि त्यांच्या पत्नी मंगल यांना आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील महापूजेचा बहुमान मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते ही महापूजा झाली. त्यामुळे यावर्षी नगर जिल्ह्यातील नेवासा येथील वडाळा बहिरोबा या दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आज (ता. 29 जून) आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा झाली. या महापूजेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दांपत्यासमवेत काळे दाम्पत्य सहभागी झाले होते. महापूजेचा मान मिळाल्यानंतर या गणपतीला एक वर्षाचा मोफत एसटी पास एस टी महामंडळाकडून देण्यात आला आहे.
या महापूजेवेळी विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, तानाजी सावंत, गिरीश महाजन, दीपक केसरकर, अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

