Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अधिकार नसताना जमीन व्यवहारास बेकायदा परवानगी व दस्तावेज नोंदणी प्रकरणी तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांसह महसूलच्या 6 अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तब्बल 38 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
गुन्हेगारी

अधिकार नसताना जमीन व्यवहारास बेकायदा परवानगी व दस्तावेज नोंदणी प्रकरणी तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांसह महसूलच्या 6 अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तब्बल 38 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

महसूल विभागात खळबळ
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/07/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

लाच लुचपतची कारवाई; एसीबीचे उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांची माहिती

या संदर्भात सन 2017 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर कार्यालयाकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या तक्रार अर्जाच्या चौकशीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र संवाद न्यूज

अहमदनगर – अधिकार नसताना महार वतनाच्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारास परवानगी देऊन, बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या फेरफार नोंदी व दस्तावेज करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूलच्या 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 32 खासगी अशा एकूण 38 जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांसह महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अहमदनगरचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी व्ही. टी. जरे, तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र मुठे, तत्कालीन तहसीलदार एल. एन. पाटील, वडगाव गुप्ता सध्याचे तत्कालीन तलाठी एल. एस. रोहोकले, तत्कालीन मंडळ अधिकारी दुर्गे, तत्कालीन सह दुय्यम निबंधक दिलीप बबन निराली या अधिकाऱ्यांना देखील या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आले आहे.

वरील आरोपींसह संबंधित जमिनीचे भोगवटादार दिनकर आनंदा शिंदे, विनायक शंकर शिंदे, बाबू आनंदराव शिंदे, मोहन आनंदराव शिंदे, वामन किसन शिंदे, यादव किसन शिंदे, सदाशिव केशव शिंदे, रामभाऊ केशव शिंदे, सुनील केशव शिंदे, यादव केशव शिंदे, मालन केशव शिंदे, लता शांतवन भाकरे, अरुण दगडू शिंदे, शालन दगडू शिंदे, लक्ष्मण रामचंद्र शिंदे, मथुरा विष्णु शिंदे, संदीप विष्णु शिंदे, सुनीता रतन गायकवाड, नंदा श्याम घाटविसावे, शालू शाहूराव प्रभुणे, मच्छिंद्र आनंदराव शिंदे, लीला चंद्रभान पाडळे, शोभा बुद्धिराम ठाकूर तसेच संमती देणारे वत्सला तुकाराम पाचारणे, सुशीला शांतवन घाटविसावे, तुळसा मारुती नरवडे, बुबाई शिवाजी साळवे, इंद्रायणी विठ्ठल जाधव, वत्सला वामन जाधव, कौशल्या दामू जगताप यांचे मुख्तार उत्कर्ष सुरेश पाटील (श्रमिकनगर, आनंदऋषी मार्ग, अहमदनगर), जमीन खरेदी करणारे अजित कचरदास लुंकड (आनंददर्शन अपार्टमेंट, मार्केट यार्ड मागे अहमदनगर) यांचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये समावेश आहे.

अहमदनगर शहराजवळील वडगाव गुप्ता येथील गट क्रमांक 203 क्षेत्रातील 2 हेक्टर 97 आर, पोट खराबा 0.09 आर व गट क्रमांक 205 मधील 1 हेक्टर 34 आर ही इनाम वर्ग 6 ब ची जमीन जुन्या शर्तीवर करण्यासाठी तत्कालीन तहसीलदार एल. एन. पाटील यांनी बेकायदेशीर परवानगी दिली. तहसीलदार पाटील यांनी काढलेल्या या बेकायदेशीर आदेशास तलाठी एन. एस. रोहोकले, तत्कालीन मंडल अधिकारी दुर्गे यांनी मदत केली. व खरेदी-विक्री व्यवहाराच्या नियमबाह्य फेरफार नोंदी घेऊन खासगी इसम उत्कर्ष पाटील व अजित लुंकड यांना मदत केल आहे.

तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी व्ही. टी. जरे व तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र मुठे यांना सदरचा आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती असून देखील त्यांनी कुठलीही कारवाई न करता या बेकायदेशीर व्यवहारास एक प्रकारे प्रोत्साहन दिल्याचे दिसून येते. याशिवाय तत्कालीन सह दुय्यम निबंधक दिलीप निराली यांनी या खरेदी विक्री व्यवहाराचे बेकायदेशीर दस्त नोंदविले आहेत.

तसेच सदर जमिनीचे भोगवटादार, संमती देणार यांच्यासह जनरल मुखत्यार सुरेश पाटील, जमीन खरेदी करणारे अजित लुंकड यांना सदरची जमीन ही महार वतन हाडोळा इनाम वर्ग ब ची जमीन असल्याचे माहित असून देखील त्यांनी तहसीलदारांना जमीन जुन्या शर्तीवर करण्यासाठी, अटी व शर्तीवर परवानगी देण्यासाठी मदत करून, खोटे कागदपत्र तयार करून जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करत सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंदी घेतल्या. खोटे दस्त तयार करून शासनाची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1998 चे कलम 13(1)(ड), 13(2) सह भारतीय दंड विधान कलम 167, 420, 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास एसीबीचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे करत आहेत.

सदर कारवाई एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगरचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक राजु आल्हाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र निमसे, पोलीस नाईक विजय गंगुल यांच्या पथकाने केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,016
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

By Annant Ppangarkar18/10/20260

प्रवीण पुरो- भारतीय संविधानाने घटनात्मक अधिकार दिलेल्या कोणत्याही संस्थेवर पक्षपातीपणाचा वा राजकीय वरदहस्ताचा आरोप झाला,…

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.