महाराष्ट्र संवाद न्यूज
पुणे – पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त असलेल्या भरत गायकवाड यांनी आपली पत्नी आणि पुतण्याची गोळी घालून सोमवारी पहाटेच्या वेळी हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलीस दलात या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त असलेले गायकवाड पुण्यातील बाणेर परिसरात कुटुंबियासह वास्तव्यास आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
गायकवाड यांनी सोमवारी पहाटे चार वाजता पत्नी मोनी गायकवाड (वय 44 वर्षे) व त्यापाठोपाठ दीपक गायकवाड (वय 35 वर्ष) या पुतण्याची गोळी झाडून हत्या केली. दोघांची हत्या केल्यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून हत्या केली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून केला याचा पोलीस शोध घेत आहे.

