Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीवरील अत्याचारापाठोपाठ संगमनेरच्या पठार भागात महाविद्यालयीन युवतीला फसवून विवाह करत अत्याचाराचा प्रकार समोर
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारापाठोपाठ संगमनेरच्या पठार भागात महाविद्यालयीन युवतीला फसवून विवाह करत अत्याचाराचा प्रकार समोर

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

इंस्टाग्राम अँपवर जुळले होते सूत

बळजबरीने केलेल्या लग्नाला आरोपीच्या नातेवाईकांची होती उपस्थिती

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – अल्पवयीन शालेय मुलीला पळवून नेत संगमनेरातील कॅफे सेंटरमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता घारगावच्या पठार भागात एका महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करत पहिले लग्न झालेले असताना ते लपवून ठेवत तिच्याशी विवाह करून तिच्यावर लग्नाअगोदर आणि लग्नानंतरही बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून केशव बबन काळे याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 366, 376(2N) 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळते. गेल्या तीन-चार दिवसातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पठार भागात महिलांवरील अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ झाल्याचे दिसते.

पठार भागातील अत्याचारित तरुणी संगमनेर मधील एका महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेचे शिक्षण घेत आहे. या युवतीची इंस्टाग्राम ॲपवर केशव काळे याच्याशी ओळख झाली होती. या ॲपच्या माध्यमातून त्यांच्यात चॅटींग होत असे. तसेच मोबाईलवर देखील संभाषण होत असे. 15 जुलैला पीडित तरुणी महाविद्यालयात येण्यासाठी गावातील चौकात उभी असताना तेथे आलेल्या आरोपी काळे याने तिला बळजबरीने आपल्या दुचाकीवरून पिंपळगाव देपा-शिरापूर मार्गे संगमनेर येथे आणले. त्यानंतर संगमनेरहून तिला अकोले- ओतुरमार्गे कबाडवाडी (ता. जुन्नर) येथे नेले.

15 आणि 16 जुलैला पीडित तरुणी आरोपीसोबत आरोपीच्या मामाच्या घरी थांबले होते. आरोपीने तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी जीव देईल असे धमकावत या दोन दिवसात तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. त्यानंतर 17 जुलैला देखील सकाळी लग्नासाठी आली नाही तर मी जीव देईन अशाप्रकारे धमकावत जुन्नर येथून मोटरसायकलवर बसवून तिला आळंदी येथे नेले. तेथे अलंकापुरी विवाह संस्थेत तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. यावेळी आरोपीच्या आई-वडिलांसह अन्य नातेवाईक देखील उपस्थित होते. लग्न करतेवेळी आरोपीने तो अविवाहित असल्याचे तेथे लिहून दिले होते. लग्नाच्या रात्री देखील आरोपीने तिला मामाच्या घरी आणत तिच्यावर अत्याचार केले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपीने तिला त्याच्या घरी कुरकुंडी येथे आणले होते. तेथे तिला आरोपीचे लग्न झालेले असल्याचे समजले. त्यानंतर पीडित तरुणीने मोबाईलवरून आपल्या भावाशी संपर्क साधत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. तरुणीच्या आई-वडिलांचा भावाने कुरकुंडी येथे जाऊन तिला घरी आणले त्यानंतर संबंधित युवतीने मंगळवारी घारगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करीत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,738
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.