Author: अनंत पांगारकर

विशेष लेख राज्यातील महिलांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, गरीब महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे तसेच पर्यावरणाची हानी टाळणे याबाबींचा विचार करुन राज्य शासनाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध देण्याची घोषणा करण्यात आली आहे.   या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेचा १ जुलै २०२४ पासून प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची पात्रता… योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या…

Read More

बुधवार, २५ सप्टेंबर अहमदनगर – नगर जिल्ह्यात एका तालुक्याच्या ठिकाणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाने खाकी वर्दीचा धाक दाखवत आपल्या पत्नीला पळवून नेल्याची तक्रार श्रीगोंदे येथील व्यक्तीने केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुलांसह उपोषण करण्याचा इशारा या महिलेच्या पीडित पतीने दिला आहे. यासंबंधीचे निवेदन महिलेच्या पतीने पोलीस अधीक्षकांना दिले आहे. २७ सप्टेंबरपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पीडित पती मुलांसह उपोषणास बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याने पीडित महिलेच्या पतीवर ही दुर्दैवी वेळ ओढविली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात पिडीत पतीने म्हटले आहे की, या घटनेमुळे घरातील लहान मुले आईच्या प्रतिक्षेत…

Read More

बुधवार, २५ सप्टेंबर पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचे तोंड दाबून फरफटत नेत २३ वर्षीय नराधमाने केलेल्या बलात्काराचा प्रकार समोर आला आहे. नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. २३ सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास म्हाळुंगेतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. पीडित वृद्धेच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोपी ओम जयचंद पुरी (वय वर्षे २३, सध्या रा. साखरेवस्ती, मूळ रा.…

Read More

बुधवार, २५ सप्टेंबर  नाशिक – अपील आदेशाची प्रत देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. राजेंद्र भागवत केदारे (वय ५७) लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ते कार्यरत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या भावाची पत्नी महिला बचत गटाची अध्यक्ष असून त्यांना नाशिकच्या जिल्हा पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल करण्यात आले असून या अपीलाचा निकाल तक्रारदाराच्या वहिनीच्या बचत गटाच्या बाजूने लागला होता. या अपीलाच्या आदेशाच्या निकालाची प्रत देण्यासाठी राजेंद्र केदारे यांनी पंधरा…

Read More

बुधवार, दि. २५ सप्टेंबर २०२४ मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. नफ्याचे नियोजन करण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल, परंतु जर तुम्ही तुमची शक्ती योग्य कामात वापरली तरच ते चांगले होईल. नोकरीत काम करणाऱ्या लोकांचा प्रभाव वाढेल. मित्रांसोबत कुठेतरी जाऊ शकता. जर तुमच्या वडिलांनी कामाबाबत काही सल्ला दिला तर तुम्ही त्यांचे म्हणणे पाळले पाहिजे. पुरस्कार प्राप्त केल्याने पार्टी आयोजित केली जाऊ शकते. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर परिश्रमाने भरलेला असणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नोकरीत काम करणाऱ्या लोकांचे अधिकारी त्यांच्या कामावर खुश राहतील, त्यामुळे त्यांना प्रमोशनही मिळू शकते. जर…

Read More

भगूरमध्ये साकारणार सावरकरांच्या जीवनावर आधारित थीमपार्क पंढरपुरातील दर्शन मंडप, दर्शन रांगेसाठी १२९ कोटींची तरतूद मंगळवार, २४ सप्टेंबर मुंबई : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानुसार तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. तसेच सर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी, असे…

Read More

मंगळवार, २४ सप्टेंबर अहमदनगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये २४ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

मंगळवार, २४ सप्टेंबर मुंबई – महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला ह्या अत्यंत वादग्रस्त अधिकारी आहेत. शुक्ला यांची सेवा जून २०२४ रोजी समाप्त झाली असतानाही भाजपा-युती सरकारने जानेवारी २०२६ पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली आहे. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये होतील. या निवडणुका निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी, वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

Read More

मंगळवार, २४ सप्टेंबर मुंबई : न्यायालयाच्या कामाचे स्वरूप आणि आवाका हा प्रचंड वाढल्याने न्यायालयाची जागा आणि सुविधा यांची आवश्यकता वाढली आहे. नवी आव्हाने, नवीन उद्दिष्टे आणि न्यायपालिकेचा भविष्यात्मक दृष्टिकोन, त्यातील बदल याचा विचार करता नवीन इमारत ही काळाची गरज आहे. नवीन संगणकीय बदल, डिजिटायझेशन, पेपरलेस कोर्ट, न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे “न्याय आपल्या दारी” या सगळ्या बाबींचा विचार करता नवीन इमारत मोठी आणि अद्ययावत बांधणे, हे सगळ्यांसाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळेच आजचा दिवस हा मुंबई उच्च न्यायालयाच्या कारकीर्दीचा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस ठरणार असल्याचे मत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. वांद्रे पूर्व येथे प्रस्तावित नवीन उच्च…

Read More

मंगळवार, २४ सप्टेंबर मुंबई :- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मौजे चिकणी येथील जमीन हस्तांतरण व्यवहार बेकायदेशीर असून याप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात यावेत तसेच या जमीन नोंदणीची निर्गमित झालेली सूचना नियमबाह्य असल्याने रद्द करण्याची कार्यवाही केली जावी, अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी प्रशासनाला दिल्या. मंत्रालयात मौजे चिकणी येथील जमीन व्यवहार नोंदणीच्या अनुषंगाने महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, वन विभागाचे प्रधान सचिव एच. गोविंदराज उपस्थित होते. तसेच अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.…

Read More