Author: अनंत पांगारकर
बुधवार, दि. १२ जून २०२४ लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याच्या कारणावरून प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे यांच्या निलंबनाला काही तास उलटत नाही तोच आता विधान परिषदेचे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांचे सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. पक्ष विरोधी काम करणाऱ्या काँग्रेसमधील नेत्यांवर निलंबनाची कारवाई सुरू झाली असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून कारवाई सत्र सुरू झाले आहे. गावंडे पाठोपाठ लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन…
बुधवार, दि.१२ जून २०२४ नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून उमेदवारी दाखल केलेल्यापैकी तब्बल १५ जणांनी माघार घेतली असून यात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील या दिग्गज उमेदवारासह काँग्रेसच्या उमेदवाराचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात २१ उमेदवार उरले असून या मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षक मतदार संघासाठी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १५ जणांनी माघार घेतली. यात मंगळवारी चौघांचा तर आज ११ जणांचा माघार घेणाऱ्यात समावेश आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्याने या निवडणुकीत आता महाविकास आघाडी कडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा…
बुधवार, दिनांक १२ जून २०२४ उत्तरप्रदेशमधून संगमनेरमध्ये रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय व्यक्तीकडून एका मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवस्तीत हा प्रकार समोर आला असून पकडलेल्या आरोपीने सुरुवातीला पोलिसांना खोटे नाव सांगून तक्रारदार व पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने आपले खरे नाव पोलिसांना सांगितले. प्रकाश रामनरेश निसाद (रा. पावबाकी रोड, संगमनेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी, ४२ वर्षीय पीडित महिला वेडसर असून ती आपल्या आईसह शहराच्या उपनगरात राहते.…
बुधवार, दिनांक १२ जून २०२४ दरोड्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेली टोळी संगमनेर पोलिसांनी बुधवारी पहाटे पकडली. टोळीतील चौघेजण पोलिसांच्या हाती लागले तर दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. बबलू अनिल निकाळे (रा. आंबेडकर नगर, राहता) याच्यासह तिघा अल्पवयीन मुलांचा आरोपींमध्ये समावेश असून रितेश सदाफळ व बुट्ट्या सदाफळ (दोघे रा. गणेश नगर, राहता) अशी पसार झालेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील अमरधाम जवळील एका चिंचेच्या झाडाच्या आडोशाला पोलिसांना संशयास्पदरित्या हालचाली करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला मात्र त्यापैकी चौघांना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. तर दोघे पसार झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून…
बुधवार, दि. १२ जून २०२४ लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या सचिवाला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. प्रदेश काँग्रेस सचीव प्रशांत गावंडे यांच्यावर ही कारवाई प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने करण्यात आली असून त्यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे. बुधवारी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी पटोले यांच्या आदेशावरून गावंडे यांच्यावर कारवाईचे आदेश काढले आहे.
बुधवार दिनांक १२ जून २०२४ संगमनेरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. विशाल संपत बोऱ्हाडे (रा. माधवनगर, राजापूर रस्ता, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून तो पसार झाला आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मंगळवारी (दि. ११) गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिच्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा विशाल बोऱ्हाडे याने गैरफायदा घेतला. मुलीला त्याच्या घरी घेऊन जात त्याने तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. ४ जून संध्याकाळी…
बुधवार दिनांक १२ जून २०२४ जमिनीच्या खरेदी व्यवहारापोटी शिवसेनेच्या शहरप्रमुखांकडून २५ लाख रुपये घेऊन त्या बदल्यात करून दिलेले साठेखत रद्द न करता अथवा घेतलेले पैसे परत न देता त्याच जमिनीची परस्पर दुसऱ्याला विक्री करत फसवणूक केल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते (वय ४९ वर्ष, रा. भूषणनगर, केडगाव, अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. सातपुते यांच्या तक्रारीवरून नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात अंकुशराव जयवंतराव नागरे, जालिंदर जयवंतराव नागरे, गजेंद्र बाळासाहेब नागरे, शांताबाई बाळासाहेब नागरे, कविता संजय फुंदे व राजकुमार अंकुशराव नागरे (सर्व रा. संगम जळगाव, ता. गेवराई, जि. बीड) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचे…
मंगळवार, दिनांक ११ जून २०२४ नगर जिल्ह्यासह जिल्ह्यातून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांची संख्या मोठी असल्याने दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, राहण्याची व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह आदी सारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे तसेच याबाबत काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. आषाढी वारीच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संत निळोबाराय पालखीचे अध्यक्ष अशोकराव सावंत, मानाच्या पालख्यांचे तसेच जिल्ह्यातील दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील अनेक दिंड्या…
मंगळवार, दिनांक ११ जून २०२४ सरकारने आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान त्यांनी उपचारासाठी नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मोठा लढा उभारत शासनाला या संबंधीचा अध्यादेश काढण्यास भाग पाडले होते मात्र या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याने जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. शनिवारपासून अंतरवली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. मंगळवारी आरोग्य विभागाचे पथक वैद्यकीय तपासणीसाठी उपोषण स्थळी आले होते. तपासणीअंती जरांगे यांचा बीपी, शुगर कमी झाल्याने त्यांना वैद्यकीय उपचारांची…
मंगळवार, दिनांक ११ जून २०२४ मंगळवारी झालेल्या पावसाने संगमनेर शहराला चांगलेच झोडपून काढले. तासाभरापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या या पावसामुळे शहरातील बहुतांशी रस्त्यावर सर्वत्र पाण्याचे नाले प्रवाहित होऊन रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. नवीन नगर रस्त्यावर गुडघाभरापेक्षा अधिक उंचीने पाणी वाहताना दिसत होते. शनिवारी झालेल्या पावसामुळे संगमनेरात शेतीच्या कामाला वेग आला असताना मंगळवारी देखील पावसाने संगमनेरात जोरदार हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वातावरणात उकाडा जाणवत होता. सायंकाळी पावणे चारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नेहमीप्रमाणे शहरातील नाल्यांची दूरवस्था पुन्हा एकदा उघडी पडली होती. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची एकच…
