महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार यावर्षी पुन्हा संगमनेर महाविद्यालय जाहीर झाला आहे. महाविद्यालयाने यावर्षी तब्बल दहा पुरस्कार प्राप्त करत संगमनेरचा सन्मान वाढविला.
असे आहेत पुरस्कार : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचेवतीने राष्ट्रीय सेवा योजना या विद्यार्थीभिमूख विविध उपक्रमांतर्गत सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविणा-या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिला जाणारा यावर्षीचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त झाला. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सचिन कदम यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. डॉ. प्रताप फलफले यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक म्हणून उल्लेखनिय कार्य केल्याबदद्ल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. सुजाता शिरोडे यांना दि. ३ ते १२ जून २०१९ या कालावधीतील आव्हान २०१९ राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील महत्वाची कामगिरी बजाविल्याबद्दल व प्रा. संदिप देशमुख यांना दि. २३ जून ते १२ जुलै या कालावधीत स्वच्छ वारी- स्वस्थ वारी -निर्मल वारी- हरीत वारी आळंदी- देहू ते पंढरपूर रासेयो दिंडी तसेच दि. २२ ते २८ ऑगस्ट २०१९ या कालावधीत कोल्हापूर- सांगली पूरग्रस्त आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेमध्ये उत्कृट कामगिरी बदद्रल संघनायक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कु. वसुधा दातीर या विद्यार्थिनीस उत्कृष्ट कामगिरी केल्याबदद्ल उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाला. कोविड-१९ च्या काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबददल प्रविण काकड व प्रतिक पावडे उत्कृष्ठ स्वयंसेवक म्हणून यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कु. अशोक थिटमे यांना प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे राजपथावरील संचलनाबद्दल स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरणावेळी यांची होती उपस्थिती: याप्रसगी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्या श्रीमती भाग्यश्री मंठाळकर, विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यांनी केले अभिनंदन: महाविद्यालयास प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश क्षत्रिय, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, जनरल सेक्रेटरी सी. ए. नारायण कलंत्री, खजिनदार राजकुमार गांधी आदींनी अभिनंदन केले.

