Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पत्रकारिता अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर; संगमनेर महाविद्यालयात यांनी मिळविले यश…
शिक्षण

पत्रकारिता अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर; संगमनेर महाविद्यालयात यांनी मिळविले यश…

बारा वर्षांपासून सुरू आहे अभ्यासक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/08/2023Updated:09/08/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अविनाश बोधक, साईसुधा बच्चा–वनम, सविता हासे–घोलप आणि स्वप्नाली भुतडा–तापडे पहिल्या तीन क्रमांकात 

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – संगमनेर महाविद्यालय सुरू असलेल्या पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाचा 2022-23 यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात अविनाश बोधक यांनी 73.28 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. तर साईसुद्धा बच्चा–वनम व सविता हासे–घोलप यांनी 71.42 टक्के गुण मिळवत संयुक्तरित्या द्वितीय तर स्वप्नाली भुतडा–तापडे यांनी 70.14 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे अभ्यासक्रम समन्वयक प्रा. सुशांत सातपुते यांनी दिली.

बारा वर्षापासून सुरू आहे अभ्यासक्रम: शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या बारा वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रम सुरू आहे. विविध प्रात्यक्षिके, सराव सत्र व इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे अहमदनगर बरोबरच नाशिक, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यातून विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी संगमनेर महाविद्यालयात प्रवेश घेतात.

यांना आहे संधी : गृहिणी तसेच नोकरी करून पत्रकारिता किंवा लेखन कौशल्य शिकू इच्छिणाऱ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक रविवारी सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत संगमनेर महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रमाचे वर्ग चालविले जातात. मुद्रित माध्यमांबरोबरच दूरचित्रवाणी, नभोवाणी तसेच शासनाच्या विविध विभागात, विविध व्यावसायिक आस्थापनांमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरीच्या संधी या अभ्यासक्रमाद्वारे उपलब्ध होऊ शकतात. पत्रकारितेबरोबरच मराठी भाषेचे विविध पैलू अधिक चांगल्या पद्धतीने शिकू इच्छिणाऱ्या शिक्षकांचाही या अभ्यासक्रमाला दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळतो.

यशस्वी विद्यार्थ्यांत यांचा आहे समावेश : अविनाश बोधक, साईसुद्धा बच्चा–वनम व सविता हासे–घोलप, स्वप्नाली भुतडा–तापडे या पहिल्या तीन यशस्वी विद्यार्थ्यांसोबत वृषाली सोनी–कासट व बाळू बिन्नर यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला. यावर्षीच्या अभ्यासक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने यश मिळविले आहे.

नवीन प्रवेश सुरू: सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. इच्छुकांनी प्रा. सुशांत सातपुते (9766760926) यांच्याशी संगमनेर महाविद्यालयाच्या कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

यांनी केले अभिनंदन: उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, अभ्यासक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष खेडलेकर, अभ्यासक्रम समन्वयक प्रा. सुशांत सातपुते यांनी अभिनंदन केले आहे.

… पत्रकारिता अभ्यासक्रमात पहिल्या पाच क्रमांकात उत्तीर्ण झालेल्यांमध्ये चार शिक्षक व दोन गृहिणी आहेत. यातील प्रत्येकाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होऊन 15 ते 30 वर्षे झाली आहेत. आमच्यातील कुणीही पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत नाही, परंतु लेखन कौशल्य विकसित व्हावे, मराठी भाषेचे विविध पैलू अधिक बारकाईने समजावे व यातून सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीचे कौशल्य अधिक विकसित व्हावे म्हणून आम्ही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. आमचा हा हेतू १०० टक्के सार्थ ठरला. 

अविनाश बोधक (यशस्वी विद्यार्थी व जिल्हा परिषद शिक्षक)  

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,536
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.