Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एकमेकांचे पती-पत्नी पळवापळवीचे खेळ सुपारी देऊन चालविल्यासारखे… कीर्तनकार आफळे महाराज यांनी व्यक्त केली खंत
सामाजिक

एकमेकांचे पती-पत्नी पळवापळवीचे खेळ सुपारी देऊन चालविल्यासारखे… कीर्तनकार आफळे महाराज यांनी व्यक्त केली खंत

मालपाणी उद्योग समूहाचा उपक्रम
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

श्रावण महिन्याच्या निमित्ताने कामगारांसाठी कीर्तनाचे आयोजन

समाजाला दिशा दाखविणारी माध्यमे दिशाहीन

महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर – मालपाणी उद्योग समूहातील कामगार आपल्या कामातच विठ्ठलाचे रूप बघणारे आहे. आयुष्यातला आनंद द्विगुणित करण्यासाठी नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्याचे आवाहन करताना आजकाल नाटक, चित्रपट, समाज माध्यमांनी विकृतीची परिसीमा गाठली. टीव्ही मालिकांनी तर कहरच केल्याचे स्पष्ट करत बहुसंख्य मालिकांमध्ये एकमेकांचे पती-पत्नी पळवापळवीचे खेळ सुपारी देऊन चालविले जात असल्याची खंत प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त महाराज आफळे यांनी व्यक्त केली.

येथील मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने श्रावण मासानिमित्त आफळे महाराजांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, व्यवस्थापक रमेश घोलप आदी उपस्थित होते.

आफळे महाराज म्हणाले, सभ्य आणि पवित्र अशी आपल्या संस्कृतीची जगात ओळख आहे. मात्र टीव्ही मालिका आणि चित्रपटातून असभ्यपणा, अश्लीलता, चारित्र्यशून्यता याचा भडीमार सुरु आहे. त्यामुळे तरुण पिढी आपल्या मार्गापासून विचलित होण्याचे प्रकार घडत आहेत. श्रावणात अनेकजण महादेवाचे पूजन करतात. त्याचा परिणाम त्यांच्या वागणुकीमध्येही दिसायला हवा.

यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत कबीरांपर्यंतच्या विविध संतांच्या जीवनाचे आणि त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे दाखले त्यांनी दिले. आजच्या जीवनात संतसाहित्याचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले. आपल्या संतांनी कोणत्याही कामाकडे लहान-मोठे म्हणून कधी बघितले नाही. त्यांना आपल्या कामातूनच साक्षात पांडूरंगाचे दर्शन घडले.

आज ज्या माध्यमांनी समाजाला दिशा दाखवावी ती माध्यमेच दिशाहीन झाल्याने भविष्यात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील इशारा त्यांनी दिला. संतसाहित्यातून मनशांती, सुख आणि आत्मीक आनंद मिळतो आणि तो टिकाऊ असतो. त्यात रमणारी व्यक्ती आनंदाची एकेक पायरी चढत परमानंद, ब्रह्मानंद आणि आत्मानंद अशा सर्वोच्च पातळीवर जावून पोहोचते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संतसाहित्य शिकवले गेले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कामातच राम बघणार्‍या कामगार आणि कर्मचार्‍यांच्या समर्पण वृत्तीतून काय घडू शकते याचे मूर्तीमंत उदाहरण मालपाणी उद्योग समूहात बघायला मिळते असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक, कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.

राजेश मालपाणी यांनी स्वागत केले. रमेश घोलप यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मालपाणी उद्योग समूहातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 632
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.