Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

August 2, 2026

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन
सामाजिक

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

जेव्हा युवक एकत्र येतात तेव्हा परिवर्तनाचा मार्ग अधिक वेगाने खुला होतो
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

मुंबई: 

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावरून केलेल्या आवाहनाला राज्यभरातून, विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि पुणे परिसरातील तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्याची तयारी अनेक युवक, विद्यार्थी आणि विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी संघटनांनी दर्शवली आहे.

फ्रेंडशिप डेच्या संदेशातून आमदार तांबे यांनी “मित्र एकत्र आले तर मोठा बदल घडवू शकतो” हा संदेश देत आपल्या मित्राला टॅग करण्याचे आणि ९ ऑगस्टच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट शेअर होत असून, अनेक विद्यार्थी आपल्या मित्रांसह आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगत आहेत.

विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी तसेच युवक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, नाशिक–सिन्नर–संगमनेर–अकोले–आळेफाटा–नारायणगाव–मंचर–राजगुरूनगर–चाकण या सरळ मार्गाची गरज अधोरेखित केली आहे. हा मार्ग विद्यार्थी, शेतकरी, कामगार, उद्योग आणि रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याची भावना तरुणांमध्ये व्यक्त होत आहे.

याबाबत आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, “ही केवळ रेल्वेची मागणी नाही, तर उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची लोकचळवळ आहे. तरुणांचा वाढता सहभाग आणि महाविद्यालयांमधून मिळणारा पाठिंबा ही या आंदोलनाची सर्वात मोठी ताकद आहे. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाचा आवाज महत्त्वाचा असतो आणि जेव्हा युवक एकत्र येतात तेव्हा परिवर्तनाचा मार्ग अधिक वेगाने खुला होतो.”

९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही आमदार तांबे यांनी केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 118
आवाहन चक्काजाम पुणे नाशिक रेल्वे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मुंबई:  फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावरून केलेल्या…

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026

रविवार विशेष लेख – भगव्या देशा.. अनपढ देशा.. मोदींच्या देशा…

August 2, 2026

रविवार, ०२ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

August 2, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.