Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लावणीचा युवक महोत्सवात लोकनृत्य म्हणून समावेश करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार : पद्मश्री रघुवीर खेडकर
महाराष्ट्र संवाद विशेष

लावणीचा युवक महोत्सवात लोकनृत्य म्हणून समावेश करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार : पद्मश्री रघुवीर खेडकर

राज्यात समावेश नसल्यामुळे अखिल भारतीय विद्यापीठ महासंघाच्या राष्ट्रीय युवक महोत्सवातही लावणीला लोकनृत्याचे स्थान मिळालेले नाही, ही बाब महाराष्ट्रासाठी भूषणावह नसल्याचे दळवी यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

लावणीचा युवक महोत्सवात लोकनृत्य म्हणून समावेश करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी म्हटले आहे. यामुळे शासन स्तरावर लावणीला लोकनृत्याचा दर्जा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संगमनेर शाखेच्या वतीने पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी संगमनेर नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार दळवी, प्रमुख कार्यवाह विशाल कदम, उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाणे, द्वारकानाथ जाधव, दत्ता बटवाल आदी मान्यवर उपस्थित होते

सत्कार प्रसंगी नाट्य परिषदेच्या संगमनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार दळवी यांनी राज्यपाल कार्यालयामार्फत गेल्या २१ वर्षांपासून आयोजित होणाऱ्या ‘इंद्रधनुष्य’ या अंतरविद्यापीठ युवक महोत्सवात अद्याप लावणीचा लोकनृत्य म्हणून समावेश झालेला नाही, याकडे खेडकर यांचे लक्ष वेधले. राज्यात समावेश नसल्यामुळे अखिल भारतीय विद्यापीठ महासंघाच्या राष्ट्रीय युवक महोत्सवातही लावणीला लोकनृत्याचे स्थान मिळालेले नाही, ही बाब महाराष्ट्रासाठी भूषणावह नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी तातडीने शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

तमाशा आणि लोकनाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर, आता खेडकर यांच्या पुढाकारामुळे लावणीला लोकनृत्याचा दर्जा मिळेल असा विश्वास डॉ. दळवी यांनी व्यक्त केला. लावणीचा युवक महोत्सवात समावेश झाल्यास उपेक्षित असलेल्या या कलाप्रकाराचा अभ्यास, प्रचार आणि प्रसार होण्यास मोठी चालना मिळेल असे खेडकर यांनी नमूद केले. तसेच लोककलावंत परिषद आणि तमाशा परिषद या संस्थांच्या माध्यमातून व वैयक्तिक पातळीवरही या विषयाचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 352
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचे राजकीय वजन कमी झाल्याचा दावा करणाऱ्यांना…

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.