Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला
आंदोलन

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच हे आमरण उपोषण सुरू झाल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

साकूर:

संगमनेर तालुक्यातील मांडवे आणि बिरेवाडी गावांच्या हद्दीवर नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या पोल्ट्री शेडवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बिरेवाडी येथील संतोष माणिक गळंगे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज शुक्रवारपासून (१४ ऑगस्ट) बिरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.

संतोष गळंगे यांनी मांडवे बुद्रुक हद्दीत आपल्या घरापासून अवघ्या ५० फुटांवर असलेल्या अनधिकृत पोल्ट्रीवर कारवाई करण्याची आणि बिरेवाडी हद्दीतील दोन पोल्ट्रींची ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ (एनओसी) रद्द करून त्या सीलबंद करण्याची प्रमुख मागणी लावून धरली आहे. परिसरात तीन पोल्ट्री शेड कार्यरत असल्याने अस्वच्छता, प्रचंड दुर्गंधी आणि माशांचा उपद्रव वाढला आहे. मृत कोंबड्यांची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून, सांडपाणी व विष्ठेच्या व्यवस्थापनासाठी शोषखड्डे आणि काँक्रीटीकरण न केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करताना, आपले बंधू भारतीय सैन्यात कार्यरत असून त्यांचे कुटुंब याच परिसरात वास्तव्यास असल्याचे गळंगे यांनी स्पष्ट केले. शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिन्ही पोल्ट्रींची संयुक्त पाहणी व मोजणी करून नियमबाह्य आढळणाऱ्या शेडवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी त्यांची मागणी आहे. यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांना हे पाऊल उचलावे लागले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येलाच हे आमरण उपोषण सुरू झाल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे. दुसरीकडे पोल्ट्रीधारकांमध्येही खळबळ उडाली असून, या गंभीर समस्येवर प्रशासन नेमका काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,224
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचे राजकीय वजन कमी झाल्याचा दावा करणाऱ्यांना…

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.