Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या एका सराईत टोळीचा अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांच्या पथकाने तब्बल ९२ लाख ९ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत बारामती येथील तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड टाकण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून ५०० रुपये दराच्या तब्बल १८४१९ बनावट नोटा, ५ मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली फोक्सवॅगन कार (MH 14 DF 0365) असा एकूण १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी गणेश दिलीप शेवाळे (वय ३३, रा. अशोकनगर, बारामती), सुमित विकास चंदनशिवे (वय २५, रा. तांदुळवाडी, बारामती) व सुरज वसंत कांबळे (वय २७, रा. झारगडवाडी, बारामती) या तिघांना अटक केली असून टोळीतील अन्य तीन फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
नगर एमआयडीसी क्षेत्रातील वडगाव गुप्ता रस्त्यावरील विनायक कॉलनीमध्ये आरोपी बनावट नोटांचा बाजारात वापर करण्याच्या तयारीत असल्याची पक्की बातमी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक संदीप दरवडे व त्यांच्या पथकाने गणेश शेवाळे याच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता जिन्याखाली लपवून ठेवलेल्या पिशवीमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल आणि कोरे कागद मिळून आले.
पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवताच आरोपींनी धक्कादायक खुलासा केला. मुख्य आरोपी गणेश शेवाळे याने मालेगाव (नाशिक) येथील एका व्यक्तीकडून अवघ्या २५ हजार रुपयांत या ९२ लाखांच्या बनावट नोटा खरेदी केल्या होत्या. ‘गुप्त धन’ किंवा ‘पैशाचा पाऊस’ पाडतो असा दावा करत, अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून अनेक नागरिकांची फसवणूक करण्यासाठी या नोटांचा वापर केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अटक केलेल्या तिघांकडून भारतीय चलनाच्या ५०० रुपये दराच्या १८४१९ बनावट नोटा, पाच मोबाईल, एक वॉक्सवॅगन कंपनीची मोटर (एमएच १४ डीएफ ०३६५) असा एकूण १ कोटी ३ लाख ७४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीतील आणखी तीन जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. हे तिघेही फरार आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 222
अहिल्यानगर एलसीबी पैशाचा पाऊस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

संगमनेरमध्ये डीजे नियमांचे उल्लंघन; ६ जणांवर गुन्हा दाखल

25/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.