Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जालना घटनेचे संगमनेरात पडसाद; सकल मराठा समाजाच्यावतीने निषेध, आंदोलन करत प्रशासनाला निवेदन…
आंदोलन

जालना घटनेचे संगमनेरात पडसाद; सकल मराठा समाजाच्यावतीने निषेध, आंदोलन करत प्रशासनाला निवेदन…

शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/09/2023Updated:02/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – जालना जिल्ह्यात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा संगमनेरात सकल मराठा समाज, संगमनेरकरांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. बस स्थानकासमोर काही काळ रास्ता रोको करत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त करत निषेध नोंदविला. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली जाण्याची शक्यता असून यात सकल मराठा समाज सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.

विश्रामगृहावर बैठक: जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी या गावांमध्ये मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच संगमनेरातदेखील सकल मराठा समाज आणि संगमनेरकर संतप्त झाल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी यासंदर्भात शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलन: संतप्त कार्यकर्त्यांनी विश्रामगृहापासून बस स्थानकापर्यंत मोर्चा काढत बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

निवेदन: यावेळी आंदोलकांच्यावतीने नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यात अंतरवली सराटी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर बेसुमार लाठीमार झाला. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. लाठीमाराचे आदेश देणाऱ्या वर कडक कारवाई करावी. या मागणीसाठी आम्ही आग्रही आहे.

शासकीय यंत्रणेचा गैरवापर: जगभरात कौतुकास पात्र पडल्याने व शांततेत आंदोलन करणाऱ्या सदरच्या मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार हा भ्याड हल्ला आहे. अशाप्रकारे शासकीय यंत्रणा वापरून शासन मराठा आंदोलन दडपू पाहत आहे परंतु भविष्यात याचा फार मोठा उद्रेक होईल व संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील मराठा समाज पेटून उठेल. व आपल्या न्याय हक्कासाठी यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल. त्यानंतर जे काही होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर असेल, असे देखील या निवेदनात म्हटले आहे.

यांची उपस्थिती: यावेळी सकल मराठा समाजाचे राजाभाऊ देशमुख, शरद थोरात, अविनाश थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, प्रशांत वामन, अविनाश सातपुते, शिवसेना (ठाकरे) शहर प्रमुख अमर कतारी, किरण घोटेकर, संजय औटी, मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, अमित गुंजाळ, सौरभ कोल्हे, अजिंक्य डोंगरे, शुभम दळवी, सुशांत पावसे, सुमित पवार, नारायण खुळे, अनिल सातपुते, निर्मला गुंजाळ आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 779
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.