Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुष्काळसदृश परिस्थितीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

24/09/2026

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

24/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी संगमनेरमध्ये चक्काजाम; रस्त्यावर जनसागर उसळला!
आंदोलन

नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी संगमनेरमध्ये चक्काजाम; रस्त्यावर जनसागर उसळला!

संगमनेरमधील टोल नाक्यावर झालेल्या आंदोलनात राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात, पद्मश्री रघुवीर खेडकर, अनिकेत घुले यांच्यासह विविध वक्त्यांची भाषणे झाली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी रविवारी क्रांती दिनी संगमनेरमध्ये टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या दुपारी उशिरापर्यंत ही वाहतूक सुरळीत केली जात होती. तर आपल्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर जनसागर उसळला होता.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी पूर्वी मंजूर झालेल्या सरळ रेल्वे मार्गासाठी जनआंदोलन उभे केले आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः समृद्धी महामार्गावर तर राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेरमध्ये हिवरगाव पावसा येथील टोल नाका येथे आंदोलन करण्यात आले. पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्यासह राहुल गांधी समर्थक संघ, छात्र भारती, संगमनेर शिवसेना (ठाकरे), रेल्वे कृती समिती, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते आदींसह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यापूर्वी केंद्रीय स्तरावर मंजुरी मिळालेल्या नाशिक पुणे रेल्वे मार्ग रद्द करत या मार्गात मोठा बदल करण्यात आला. वास्तविक नाशिक पुणे ही दोन मोठी शहरे या मार्गाने जोडली जाणार होती मात्र जवळचे अंतर सोडून हा रेल्वे मार्ग दूरच्या नाशिक शिर्डी अहिल्यानगर पुणे असा मंजूर करण्यात आला आहे या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. आधीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी संगमनेर तालुक्यातील २६ गावांमधील २८५ हेक्टरचे भूसंपादन करण्यात आले त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना ६८४.६२ कोटी रुपये वाटण्यात आले. रेल्वेमार्गाच्या कामाने वेग घेतला असतानाच राज्यातील सरकार बदलले आणि जवळचा असलेला सरळ प्रस्तावित रेल्वे मार्ग देखील बदलण्यात आला. परिणामी सिन्नर अकोले संगमनेर नारायणगाव खेड मंचर चाकण या सर्व तालुक्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली.
आमदार सत्यजित तांबे यांनी सुरुवातीचा सरळ रेल्वे मार्गासाठी जन आंदोलनाची हाक दिल्यानंतर त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला संगमनेरसह सिन्नर, नारायणगाव, आळेफाटा जुन्नर, मंचर, खेड, चाकण येथील सगळे नागरिक एकवटले असून या जनआंदोलनाच्या माध्यमातून नाशिक पुणे मार्गावर ठिकठिकाणी रविवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
संगमनेरमधील टोल नाक्यावर झालेल्या आंदोलनात राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात, पद्मश्री रघुवीर खेडकर, अनिकेत घुले यांच्यासह विविध वक्त्यांची भाषणे झाली. या सर्वांनी प्रस्तावित नव्या मार्गाला विरोध दर्शवत जुन्याच सरळ मार्गाने रेल्वे मंजूर करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी मोठा जन लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 959
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दुष्काळसदृश परिस्थितीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

By Annant Ppangarkar24/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पावसाच्या खंडामुळे संकट सापडलेल्या शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी शासन पूर्णपणे खंबीर…

संगमनेरमध्ये विनापरवाना वाळू वाहतुकीवर एलसीबीचा छापा; ट्रॅक्टरसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

24/09/2026

कपाशीच्या शेतात गांजाची शेती; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, हद्दपार आरोपी जेरबंद

24/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.