Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध ‘छात्र भारती’ आक्रमक; शिक्षण मंत्र्यांविरोधात हजारावर विद्यार्थी रस्त्यावर
आंदोलन

शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध ‘छात्र भारती’ आक्रमक; शिक्षण मंत्र्यांविरोधात हजारावर विद्यार्थी रस्त्यावर

शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी छात्रवर्तीचे राज्य अध्यक्ष अनिकेत घुले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर: 

राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा दर्जा ढासळत असून शासन नवीन शिक्षक भरती करण्याऐवजी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करत असल्याचा घणाघाती आरोप ‘छात्र भारती’ विद्यार्थी संघटनेने केला आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणा विरोधात हजारो विद्यार्थी मोर्चाने रस्त्यावर उतरले होते. यात विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

बदलत्या शैक्षणिक धोरणांविरोधात छात्र भारतीने तीव्र आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून देत त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे.

गेल्या १२ वर्षांपासून राज्यात योग्य प्रमाणात शिक्षक भरती न झाल्यामुळे शिक्षण व्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे. यावर मार्ग काढण्याऐवजी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयांतील ४५ मिनिटांचे तासिकेचे सत्र थेट ४० मिनिटांवर आणले आहे. यामुळे रोज २० मिनिटे आणि आठवड्याला सुमारे २ तासांचे अध्यापन कमी होऊन विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. एवढेच नव्हे तर, विज्ञान शाखेच्या प्रात्यक्षिकांसाठी (प्रॅक्टिकल) पूर्वी असणारी २० विद्यार्थ्यांची तुकडी वाढवून ३५ ते ४० करण्यात येत असून एका शिक्षकावर १२० ते १८० विद्यार्थ्यांची जबाबदारी लादण्यात येत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे गुणवत्तेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेच्या वैकल्पिक विषयांच्या बंद केलेल्या तुकड्या पूर्ववत सुरू कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचा अधिकार अबाधित राहील, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांतील तासिकेचा कालावधी पूर्ववत ४५ मिनिटे करण्यात यावा आणि प्रात्यक्षिकांसाठी विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवून गुणवत्तेची हमी द्यावी.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करता विद्यार्थी, पालक, शिक्षक संघटना व शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष अनिकेत घुले, विशाल शिंदे, राहुल जहाड, उदय पवार, हिरालाल पगडाल, ॲड. समीर लामखडे, कैफ तांबोळी आणि अभिषेक वैराळ यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 521
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026

विजेचा खेळखंडोबा अन् पाणी पळवण्याचा डाव; संगमनेरमध्ये उद्या महाआक्रोश मोर्चा!

21/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचे राजकीय वजन कमी झाल्याचा दावा करणाऱ्यांना…

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.