Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मंत्री विखे पाटलांनी घेतला गोदावरी-निळवंडे आवर्तनाचा आढावा! आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या या सूचना…
प्रशासन

मंत्री विखे पाटलांनी घेतला गोदावरी-निळवंडे आवर्तनाचा आढावा! आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या या सूचना…

नाशिक, नगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

लोणी (शिर्डी) – गोदावरीच्या पाण्याच्या आवर्तन काळात अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून नियोजन करावे. तसेच निळवंडे धरणातून पाणी सोडण्याबाबत काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

लोणीत बैठक: मंत्री विखे यांच्या उपस्थितीत लोणी येथे गोदावरी आणि निळवंडे धरण आवर्तनाच्या नियोजना संदर्भात आढावा बैठक झाली.

या अधिकाऱ्यांची उपस्थिती: यावेळी नाशिकचे अप्‍पर जिल्‍हाधिकारी राजेंद्र वाघ, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जलसंपदा विभागाच्‍या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, अधीक्षक अभियंता आमले, नगरचे कार्यकारी अभियंता स्‍वप्‍नील काळे, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक स्‍वाती भोर, नाशिकचे उपविभागीय पोलिस आधिकारी गोकावे, शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर, राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता बडगुजर, निळवंडे प्रकल्‍पाचे अभियंता हाफसे आदी उपस्थित होते.

प्रथमच ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातच पाणी देण्याची परिस्थिती उद्भवली: विखे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून धरणातील पाण्याच्या उपलब्धतेची माहिती घेत आवर्तनाच्‍या काळामध्‍ये असलेल्‍या आदेशाप्रमाणे भारनियमाच्‍या वेळापत्रकाचेही पालन करण्याचे, उपलब्‍ध पाण्‍याचा अपव्‍यय होणार नाही, यासाठी आधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी दक्षता घेण्यास सांगितले. अत्यल्प पावसामुळे यंदा प्रथमच ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातच धरणांमधून सिंचन आणि पिण्यासाठी पाणी देण्याची परिस्थिती उद्भवली असल्याने उपलब्ध पाण्याचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

चाऱ्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी मनुष्यबळ व यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणार: शेती पिकांना पाणी मिळणे गरजेचे असल्याने शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाचे नियोजन आवश्यक आहे. चाऱ्यांमधील अडथळे दूर करावे यासाठी आवश्यक तेथे जेसीबीसह अन्य साहित्य व मनुष्यबळाची उपलब्धता डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अकोल्यातील कालव्यांसाठी दहा दिवसांची डेडलाईन: निळवंडे धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचा आढावा घेत कालव्यातून तातडीने पाणी देण्यासंदर्भात नियोजन करण्याच्या व अकोले तालुक्यात असलेल्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दहा दिवसात दुरुस्त करून पाणी देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पोलिसांची मदत घ्या: वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील भार नियमनासंबंधीचे नियोजन चांगल्या पद्धतीने हाताळावे. शेतकऱ्यांना अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी तसेच बेकायदेशीरपणे पाणी उपसले जाणार नाही, याकरिता पोलीस प्रशासनाची मदत घेण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 716
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.