Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’
धार्मिक

संगमनेरमध्ये ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’चा ऐतिहासिक निर्णय; यंदा गणपती वर्गणीसाठी वापरणार ‘डिजिटल पावती ॲप’

गणेशोत्सवाच्या इतिहासामध्ये प्रथमच संगमनेर येथील 'बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा'ने सर्व सदस्यांच्या पुढाकाराने कागदमुक्त 'डिजिटल पावती ॲप'चा वापर करण्याचा क्रांतिकारी व पर्यावरणपूरक निर्णय घेतला आहे. संगमनेर शहरात असा उपक्रम राबवणारे हे पहिलेच मंडळ ठरले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर: 

दरवर्षी नवनवीन आणि अभिनव उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या संगमनेर येथील प्रसिद्ध ‘बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळा’ने यंदाच्या गणेशोत्सवात ‘डिजिटल इंडिया’ आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कागदी पावती पुस्तकांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्गणी संकलनासाठी ‘डिजिटल पावती पुस्तक’ वापरणारे बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळ हे संगमनेर शहरातील पहिलेच मंडळ ठरले आहे.

गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कागदी पावत्या छापल्या जातात. मात्र, डिजिटल युगाची गरज ओळखून मंडळाचे मार्गदर्शक व नगरसेवक योगेश (चिकू) जाजू यांच्या संकल्पनेतून हे विशेष मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. आता मंडळाचे कार्यकर्ते घरोघरी आणि दुकानांमध्ये जाताना पावती पुस्तक न नेता मोबाईलमधील ॲपद्वारे वर्गणी जमा करतील. वर्गणीदारांना त्यांची डिजिटल पावती तत्काळ व्हॉट्सॲप किंवा मेसेजद्वारे मोबाईलवर प्राप्त होईल.

या निर्णयामुळे हजारो कागदांची बचत होऊन प्रत्यक्ष वृक्षसंवर्धनाला मदत होणार आहे. याशिवाय कागदी पावत्यांवर छापलेल्या श्री गणपती बाप्पाच्या चित्रांची रस्त्यावर किंवा कचऱ्यात पडून होणारी विटंबना पूर्णपणे टळणार आहे. पावती छपाईचा खर्च आणि कार्यकर्त्यांचा वेळ वाचण्यासोबतच वर्गणीदारांकडेही त्यांची पावती मोबाईलवर सुरक्षित राहणार आहे.

तंत्रज्ञानाची कास धरून निसर्गाचे रक्षण करणारा हा उपक्रम संगमनेरमधील इतर सर्व मंडळांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष सुधीर क्षीरसागर, उपाध्यक्ष शिवमृत बोखारे, खजिनदार राजेश जोशी, कार्याध्यक्ष कपिल टाक आणि सचिव कुणाल डंबिर यांनी व्यक्त केला आहे. मार्गदर्शक व नगरसेवक योगेश जाजू यांच्या या संकल्पनेचे व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराचे संपूर्ण संगमनेरकरांकडून आणि गणेशभक्तांकडून विशेष कौतुक होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 912
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026

देवाच्या दरबारात सर्व समान; सोमेश्वर मित्र मंडळाच्या गणेशाची आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाआरती; दुष्काळमुक्तीसाठी विघ्नहर्त्याला साकडे

25/09/2026

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

By Annant Ppangarkar30/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचे राजकीय वजन कमी झाल्याचा दावा करणाऱ्यांना…

खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!

30/09/2026

बुधवार ३० सप्टेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

30/09/2026

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.