Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगरला ‘या’ नव्या अधिकाऱ्यांनी स्वीकारला जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार
प्रशासन

अहिल्यानगरला ‘या’ नव्या अधिकाऱ्यांनी स्वीकारला जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार

अहिल्यानगर येथे पदभार स्वीकारण्यापूर्वी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

अहिल्यानगर:

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मुकुंद चिलवंत यांनी आज स्वीकारला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात साध्या पण उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

मुकुंद चिलवंत यांना माहिती व जनसंपर्क विभागातील विविध स्तरांवर काम करण्याचा समृद्ध अनुभव आहे. मंत्रालय, मुंबई येथील वृत्तचित्र शाखेत कार्यरत असताना त्यांनी शासनाच्या विविध विकासात्मक उपक्रमांचे प्रभावी दृकश्राव्य दस्तावेजीकरण, जनजागृतीपर माहितीपट निर्मिती तसेच जनसंपर्कविषयक विविध उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. अहिल्यानगर येथे पदभार स्वीकारण्यापूर्वी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे तसेच प्रभावी संवादकौशल्यामुळे शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा प्रचार-प्रसार अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यभार स्वीकारल्यानंतर चिलवंत यांनी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत अधिक वेगाने, अचूकपणे व परिणामकारक पद्धतीने पोहोचविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रसारमाध्यमांशी सुसंवाद राखत माहिती विभागाची विश्वासार्हता अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी मावळते माहिती अधिकारी अमोल महाजन यांनी चिलवंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांचे स्वागत करून नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या प्रसंगी लिपिक आयुष बाळदे, तुषार पाटील वाहन चालक प्रवीण मुठे आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 485
जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय पदभार मुकुंद चिलवंत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.