Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

29/09/2026

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तालुक्यात मंत्र्यांच्या खबऱ्यांच्या सूचनेवरून कामे… हेच चित्र जर असे सुरू राहिले तर तहसील कार्यालयावर महसूल प्रशासनाविरोधात मोर्चा..
सामाजिक

तालुक्यात मंत्र्यांच्या खबऱ्यांच्या सूचनेवरून कामे… हेच चित्र जर असे सुरू राहिले तर तहसील कार्यालयावर महसूल प्रशासनाविरोधात मोर्चा..

संगमनेरात महसूल प्रशासना विरोधात रोष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/09/2023Updated:19/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – संगमनेरचे महसूल प्रशासनासह सरकारी यंत्रणा मंत्र्यांचे दौरे आणि त्यांच्या मागे पुढे करण्यात व्यस्त आहे. आमदारांनी बोलाविलेल्या टंचाई आढावा बैठकीला प्रांताधिकारी तहसीलदार गैरहजर राहतात. येथील प्रशासन आणि सरकारला गोरगरीब जनतेचे दुःख कळत नाही. अनेक लाभार्थी शासकीय लाभांपासून वंचित ठेवले जात असून संगमनेर तालुक्यात पालकमंत्र्यांच्या खबऱ्यांच्या सूचनेवरून कामे होत आहेत. हेच चित्र जर असे सुरू राहिले तर तहसील कार्यालयावर महसूल प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा सरपंच भाऊराव रहाणे यांनी दिला आहे.

तक्रारी: आमदार बाळासाहेब थोरात यांनी यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सोमवारी टंचाई आढावा बैठक बोलाविली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या कामाचे वाभाडे काढतानाच महसूल प्रशासनाच्या कामकाजाविषयी तीव्र नाराजी नोंदविली. मोठमोठ्या जाहिराती करून राज्य सरकारकडून घोषणा होत आहे. मात्र या घोषणांची कोणतीही अंमलबजावणी केली जात नाही. दुष्काळाचे मोठे संकट असताना जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी, थकलेले अनुदान, प्रशासनाचा मनमानी कारभार, वीज बिलांवर व्याज आकारणी अशा विविध प्रश्नांसंदर्भात नागरिक व पदाधिकाऱ्यांनी थोरात यांच्याकडे सरकारविरुद्ध तक्रारी केल्या.

अनुदान नाही: तालुक्यात दुष्काळाचे संकट मोठे आहे मात्र मंत्री व राज्य सरकारला याबाबत काही देणे घेणे नाही. तालुक्यात पशुधन मोठे असून याकरता सरकारने चाऱ्याची व्यवस्था केली पाहिजे. पाणीपुरवठा योजना तसेच घरगुती वीज बिलांवर सावकारी पद्धतीने 18 टक्के व्याज आकारणी केली जाते. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान मिळाले नाही. कांदा अनुदानाचे शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही. यावर्षी खरिपाची पिके पूर्णतः वाया गेले आहे. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.

खबऱ्यांच्या सूचनेवर काम: साधी शिधापत्रिका देण्यापासूनची जनतेचे छोटी-छोटी कामे अडविले जात आहे प्रशासन ठप्प आहे. संगमनेर तालुक्यात फक्त पालकमंत्र्यांच्या खबऱ्यांच्या सूचनेवर काम होत असून अनेक लोक शासकीय लाभापासून वंचित ठेवले जात आहे.

तर मोर्चा काढणार: आमदार थोरात यांनी केलेल्या पाठपुराव्यातून मिळविलेल्या मोठ्या निधीमधून मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती दिली जात आहे. जेथे-जेथे काम सुरू आहे, तेथे जाऊन खबरे अडवणूक करत आहे. विविध ठिकाणी कामे खोळंबले असून गोरगरिबांच्या घरकुलाला वाळू मिळत नाही. मात्र खबऱ्यांच्या सूचनेवरून रात्रंदिवस मुरूम व वाळू उपसा जोरात सुरू आहे. यावर स्थानिक प्रशासन गप्प असून असेच जर सुरू राहिले तर तहसील कार्यांवर मोठा मोर्चा काढावा लागेल, असा इशारा सरपंच भाऊराव राहणे यांनी दिला. बी. आर. चकोर, जनार्दन कासार, बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तक्रारी केल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 919
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘पैशाचा पाऊस’ पडणारच होता, पण…; अहिल्यानगरमध्ये ९२ लाखांच्या बनावट नोटांसह टोळी गजाआड!

By Annant Ppangarkar29/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – नागरिकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत ‘पैशाचा पाऊस’ पाडण्याचे आमिष…

दुष्काळ, जिल्हा बँक आणि राजकारण : नाण्याच्या दोन बाजू एकत्र आल्या! पुढे काय…

29/09/2026

मंगळवार २९ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

मुलांऐवजी पालकांसाठी संस्कार शिबिर घ्या! — डॉ. संजय कळमकर यांचा घणाघाती टोला; बालकुमार साहित्य संमेलनात रंगली वैचारिक चर्चा

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.