Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काक स्पर्शाआधीच वडीलाच्या दशक्रिया विधीतच मुलाचाही दुर्दैवी मृत्यू!
महाराष्ट्र संवाद विशेष

काक स्पर्शाआधीच वडीलाच्या दशक्रिया विधीतच मुलाचाही दुर्दैवी मृत्यू!

संगमनेर तालुक्यातील पिप्रींलौकी अझमपूरच्या घटनेने परिसरात शोककळा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/09/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दराडे कुटुंबावर काळाचा घाला, एकाच कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषाचा मृत्यू 

महाराष्ट्र संवाद न्यूज

आश्वी – संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी अझमपुर गावात नुकतीच मन हेलवणारी व मनाला सुन्न करणारी घटना घडली. १० दिवसापुर्वी येथील मितभाषी व जुन्या पिढीतील पदवीधर लक्ष्मण कारभारी दराडे यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. गुरुवारी (२१ सप्टेंबर) त्यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडत असतांना काकस्पर्श होण्याआधीचं त्यांचा मोठा मुलगा दिलीप (वय ४०) याचादेखील ह्रदय विकाराने मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

दशक्रिया विधीतच घडली घटना: पिप्रींलौकी अजमपूर येथे दहा दिवसांपूर्वी लक्ष्मण कारभारी दराडे यांचे उपचारादरम्यान एका खाजगी रुग्णालयात निधन झाले होते. गुरुवारी त्यांच्या दशक्रियाविधीचा कार्यक्रम सुरु होता. त्यासाठी ग्रामस्थासह नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. याचवेळी पिंडाला कावळा शिवण्याचा विधी सुरु असताना हात जोडुन उभे असलेले दिलीप दराडे हे अचानक खाली कोसळले.

मंत्री विखेंच्या उपचारासाठी सूचना: त्यामुळे ग्रामस्थ व नातेवाईक यानी वेळ न दवडता दराडे यांना आश्वी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतू दराडे यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याना पुढील उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात पाठविण्यात आले. जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारतराव गिते यानी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दुरध्वनीवरून या दुर्दैवी घटनेची माहीती दिल्यानंतर विखे पाटील यांनी प्रवरा रुग्णालयातील डॉक्टरांना उपचाराबाबत योग्य त्या सुचना दिल्या.

उपचारापूर्वीच मृत्यू: यावेळी रमेश गिते, संजय बिडवे, भाऊसाहेब गिते, मगन गिते, बाजीराव गिते, सूर्यभान गिते, नामदेव आव्हाड, भाऊसाहेब मुंढे, आनंदा दराडे, सतिष सोसे आदी रुग्णालयात धीर देण्यासाठी उपस्थित होते. मात्र तेथील डॉक्टरांनी दराडे यांनी मृत घोषित केले.

ह्रदय विकाराच्या तीव्र धक्याने वडिलापाठोपाठ मुलानेही जगाचा निरोप घेतल्याची बातमी वार्‍यासारखी आश्वीसह परिसरात पसरल्याने सर्वत्र शोककळा पसरली होती. दुपारी शोकाकुल वातावरणात दिलीप दराडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान ७ वर्षापुर्वी दराडे कुटुंबातील मयत दिलीप दराडे यांचा लहान भाऊ अभियंता महेंद्र याचेदेखील सांगोला (पंढरपुर) येथे अपघाती निधन झाले होते. त्यापाठोपाठ गेल्या दहा दिवसात दराडे कुटुंबातील दोन कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भारतराव गिते यांनी दिली आहे. तर दिवंगत दराडे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,132
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.