Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ३० वर्षात झाले नाही ते आता नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात करून दाखविणार! ‘या’ भाजप नेत्याचे वक्तव्य
राजकारण

३० वर्षात झाले नाही ते आता नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात करून दाखविणार! ‘या’ भाजप नेत्याचे वक्तव्य

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/10/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – सत्ताधारी काँग्रेस पक्षाने संगमनेर नगर परिषदेत गेल्या ३० वर्षात केले नाही ते आता आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये करून दाखविणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी म्हटले आहे.

जहागीरदार यांनी म्हटले आहे की, गेल्या ३० वर्षांपासून संगमनेर नगर परिषदेमध्ये आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे. संगमनेर नगरपलिकेत दर चार वर्षानी मालमत्तेचे (घरपट्टी) रिव्हिजन होते. रिव्हिजनचा अर्थ असा होतो की, नगरपलिका हद्दीतील जी मालमत्ता आहे त्यात काही बदल झाल्यास, नवीन इमारती, जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारत, जागेत बदल झाल्यास त्याचे फेर मूल्यांकन केले जाते.

परंतु संगमनेर नगरपलिकेत एकहाती सत्ता असलेले सत्ताधारी सर्व कायदे धाब्यावर बसवून दर चार वर्षाने रिव्हिजन होत असताना देखील घरपट्टी कायदे आपल्या सोयीनुसार राबवत असतात. सत्ताधाऱ्यांनी घरपट्टीचे दर १०% वाढवले. या संदर्भात कायदा सांगतो की, कलम ११२ नुसार घरपट्टी वाढवण्याचे किंवा कमी करण्याचे अधिकार जनरल कौन्सिलला आहे. परंतु येथे दर चार वर्षानी घरपट्टीची रिव्हिजन करतांना वाढ केली जाते यामध्ये कायद्याचा कोठेही संबंध येत नाही.

सातत्याने ३० वर्षात शहरातील घरपट्टीत वाढ करण्यात आली आहे. दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष असतांनादेखील २५/०६/२०१८ रोजी घरपट्टीत १०% वाढ करण्यात आली. महाराष्ट्रात सर्वात जास्त घरपट्टी घेणारी संगमनेर नगरपालिका आहे. या संदर्भातील बैठकांमध्ये कोणत्याही नगरसेवकाने आत्तापर्यंत विरोध केला नाही, याबाबतचे सर्व ठराव आपणाकडे उपलब्ध आहेत.

मात्र नुकत्याच वाढविलेल्या घरपट्टी विरोधात भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना १६/१०/२०२३ रोजी निवेदन देण्यात आल्यानंतर लगेच कांग्रेस वाल्यांनी दुसऱ्या दिवशी १७/१०/२०२३ ला नगरपालिकेत निवेदन देत घरपट्टी वाढीला विरोध केला.

घरपट्टी वाढीविरोधात निवेदन देणाऱ्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की, संगमनेर नगर परिषदेमध्ये तब्बल तीस वर्ष सत्ता असताना या काळात एकाही नगरसेवकाने एकदाही घरपट्टीला विरोध केला नाही मग आता यांना विरोध करण्याचा अधिकार आहे का? घरपट्टी वाढीविरोधात आपण २०१८ ला न्यायालयात, औरंगाबाद हायकोर्टात गेलो असताना सत्ताधारी काँग्रेस पक्षाने माझे वकील फोडले. आणि आज हेच लोक घरपट्टी कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची कॉपी करत आहेत.

जोपर्यंत यांच्याकडे सत्ता असेल तोपर्यंत यांची मनमानी चालत राहणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावरील खोटा बुरखा फाडण्यासाठी संगमनेर नगर परिषदेमध्ये परिवर्तनाची आवश्यकता असून संगमनेरकरांनी परिवर्तन करावे, संगमनेर नगर परिषदेमध्ये सत्ताधारी काँग्रेसने ३० वर्षात जे केले नाही ते आम्ही राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षात करून दाखवू, असे भाजपा शहर सरचिटणीस, माजी उपनगराध्यक्ष जहागीरदार यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,706
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.