Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप
राजकारण

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | मुंबई/बुलढाणा:

भारतीय जनता पक्षाला देशात लोकशाही नको असून, ‘इलेक्शन सिस्टिम’ ऐवजी ‘नॉमिनेशन सिस्टिम’ आणायची आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाने सर्व नैतिक मूल्ये पायदळी तुडवली असून, चालू असलेल्या विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विरोधी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडताना म्हटले की, विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे मर्यादित मतदार असतात. मात्र, या मर्यादित मतदारांच्या निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’ असा उघड खेळ सुरू आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घ्यावेत यासाठी सत्ता, पैसा आणि प्रशासकीय यंत्रणेचा प्रचंड गैरवापर केला जात आहे.

निवडणुकी जिंकण्यासाठी घातपात, विश्वासघात आणि पैशांचे अफाट वाटप केले जात असून, सत्ताधारी महायुती अत्यंत विकृत पद्धतीने या निवडणुकीला सामोरी जात आहे. हे चित्र निकोप लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असून त्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडणे अपेक्षित असते. परंतु, भाजपाची सत्तेची राक्षसी हाव आणि मदमस्तपणा कमालीचा वाढला असून त्याचाच प्रत्यय या निवडणुकीत येत आहे. भाजपाने लोकशाही मूल्यांची थट्टा उडवत निवडणुकीत मोठा घोडेबाजार मांडला असून, हे लोकशाहीसाठी एक ‘काळे पर्व’ आहे. या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी आता सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बोलताना सपकाळ यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही संशय व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या कमी सदस्य संख्येबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजपाला त्यांच्या भूतकाळाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे केवळ दोनच खासदार निवडून आले होते, त्यावेळी त्यांच्या सदस्यसंख्येवर कोणीही आक्षेप घेतला नव्हता. आज केवळ सदस्यसंख्येचा दाखला देऊन विरोधकांना डावलण्याची भाषा करणे, ही भाजपाची लोकशाही गुंडाळून ठेवण्याची हुकूमशाही मानसिकता दर्शवते असे सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 254
आरोप विधान परिषद निवडणूक हर्षवर्धन सपकाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.