Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश
राजकारण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगमनेर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर; अमर कतारी यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची धुरा, नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये यांचा समावेश

नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची माहिती दैनिक सामना मधून देण्यात आली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, संगमनेर तालुक्यात नव्या दमाच्या आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांकडे पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नव्या निवडीमध्ये काही पदाधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. या नव्या निवडीनुसार संगमनेर तालुकाप्रमुखपदी अमर कतारी आणि भीमाशंकर पावसे, संगमनेर तालुक्यातील मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या ३२ गावांसाठी तालुकाप्रमुख म्हणून प्रकाश गायकवाड यांचीदेखील तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संगमनेर तालुक्यात पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख म्हणून ग्रामीण भागासाठी सदाशिव हासे तर शहरी भागासाठी इम्तियाज शेख यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे. तसेच रवींद्र कानकाटे यांची उपजिल्हा संघटकपदी आणि रेवननाथ शिंदे यांची उपजिल्हा समन्वयक म्हणून निवड झाली आहे.
संगमनेर शहराच्या व विधानसभा मतदारसंघाच्या विस्तारासाठी देखील पक्षाने महत्त्वपूर्ण नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये बाळासाहेब घोडके (शहर) आणि योगेश खेमनर (ग्रामीण) यांची विधानसभाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे, तर दिलीप साळगट यांच्यावर सहसंपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संगमनेर शहरप्रमुख म्हणून रवी गिरी (घुलेवाडी) कार्यभार पाहणार असून, सतीश भुजबळ यांची तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच निवड केलेल्या शहरातील पदाधिकाऱ्यांना कायम ठेवण्यात आले आहे.
या नियुक्त्यांमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या संगमनेर भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला अधिक बळकटी मिळणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नवी कार्यकारिणी अत्यंत सक्रियपणे काम करेल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून व्यक्त केला जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,047
अमर कतारी पदाधिकारी निवडी शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यादी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.