Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप
राजकारण

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

मला अजिबात धक्का बसला नाही. मला हे अपेक्षित होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/06/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांचं जोरदार वारं वाहात आहे. एकूण १७ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत असून १८ जून रोजी या निवडणूक होत आहे. आज या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे होते. त्यानुसार, १७ पैकी अनेक मतदारसंघातील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सर्वाधिक समावेश आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे अर्ज माघारी घेण्यासाठी तब्बल १५० कोटी खर्च केले असून एका उमेदवाराला माघार घेण्यासाठी २५ कोटी दिल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राऊत म्हणाले, मला जी काही माहिती आहे, त्यानुसार पुणे, यवतमाळ या ठिकाणी उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. मी आधीपासून सांगत होतो की आपल्याकडे संख्याबळ नाही. तरीही काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशाने निवडणुका बिनविरोध होऊ नये, यासाठी उमेदवारी अर्ज भरले. ते शेवटपर्यंत टीकायला हवे होते. मात्र, निवडणुका बिनविरोधच करायच्या या सरकार पक्षाच्या अट्टहासापायी अनेक मार्गांचा अवलंब झाला आणि त्यात मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाच्या उमेदवारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला आणि तो काही ठिकाणी यशस्वी झाला, असं राऊत यांनी म्हटलं.

गुरुवारी दिवसभरात निवडणुका बिनविरोध व्हाव्यात आणि समोरच्या मविआच्या किंवा अन्य उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी किमान आज दिवसभरात १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. प्रमुख उमेदवारांनी माघार घ्यावी, यासाठी किमान २५ कोटी रुपये देण्यात आले, असं राऊत म्हणाले. काल मुंबईतील सॉफिटेल जे बीकेसीतील हॉटेल आहे, तिथे व्यवहार झाला. त्यानंतर कोकणातून माघार घेण्यात आली.

संभाजीनगरमध्ये आमच्या उमेदवाराने माघार घेतली. तिथेही साधारण त्याच पद्धतीने व्यवहार झाले, असा गंभीर आरोपच राऊतांनी केल्याने खळबळ उडाली आहे. तर शिवसेनेने बाळ माने यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे आणि संभाजीनगरमधून देवयानी डोणगावकर आणि कृष्णा डोणगावकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती देत राऊतांनी म्हटले की, हे चालणार नाही. हे विष, ही कीड चालणार नाही. ठीक आहे की आज आम्ही कुठे तरी कमी आहोत. तरीही पक्षप्रमुखांची, पक्षाची परवानगी न घेता तुम्ही माघार कशी घेऊ शकता? काय व्यवहार झाले? ही सर्व माहिती ज्याने व्यवहार केले, त्यानेच आम्हाला कळवली. ही माणसे विकत घेण्याची प्रक्रिया या राज्यात सुरू आहे. मला असं वाटतं की हे राज्य आणि देश नासवण्याचा हा प्रकार आहे. हे फार घातक आहे, असा हल्लाबोलही यावेळी राऊतांनी केला आहे.

यावेळी घोडेबाजार झालाच, असं सांगत आपले मत व्यक्त करताना म्हटले की, उमेदवारी मागे घेण्यासाठीच घोडेबाजार झाला. उमेदवारी मागे घेण्यासाठीच घोड्यांच्या किंमती ठरल्या आणि मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला. तसेच, मला अजिबात धक्का बसला नाही. मला हे अपेक्षित होते. म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की ही निवडणूक आमची नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची नाही. जो अशा पद्धतीने पैशांची उधळपट्टी करेल, घोडेबाजार करेल, उमेदवार आणि मते विकत घेईल, त्याची ही निवडणूक आहे.

ही लोकशाही नाही, हे माझे प्रामाणिक मत होते आणि मी ते प्रामाणिक मत अनेकदा माझ्या पक्षात मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महाविकास आघाडीची बेअब्रु होईल, खासकरून माझ्या पक्षाची बेअब्रू होईल, याची सारखी भीती वाटत होती, असे यावेळी खासदार संजय राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 304
राजकारण विधान परिषद निवडणूक संजय राऊत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.