Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एक फूल आणि दोन हाफ हेच काडीखोर; जरांगे पाटलांपाठोपाठ संजय राऊतांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
राजकारण

एक फूल आणि दोन हाफ हेच काडीखोर; जरांगे पाटलांपाठोपाठ संजय राऊतांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई : या राज्याचा एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे, असं विधान मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर एक फूल आणि दोन हाफ हेच काडीखोर आहेत. यांनीच महाराष्ट्र पेटवला आहे. यांनाच महाराष्ट्र पेटलेला हवाय. यांनीच राज्यातील सर्व प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रश्न चिघळत ठेवलेला आहे, असं टीकास्त्र शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री, आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सोडले आहे.

राऊत म्हणाले, मरठा आरक्षणाचा मुद्दा या सत्ताधाऱ्यांनीच चिघळत ठेवला आहे. कारण, त्यांना इतर मुद्यांवरून लक्ष भरकटवायचं आहे. त्यामुळे जरांगे पाटील म्हणाले की, एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे तर तसं नाही, एक फुल आणि दोन हाफ हे सगळेच काडीखोर आहेत.

मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला अनेक पक्षांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वगळण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून केवळ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निमंत्रित करण्यात आले. यावर राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्रीच घटनाबाह्य असल्याने त्यांना ही बैठक बोलवण्याचा अधिकारच नाही. तसंही मुख्यमंत्री 31 डिसेंबरनंतर जाणार आहेत.

6 खासदार आणि 16 आमदार असणाऱ्या पक्षाला निमंत्रित करायचं नाही आणि ज्यांचा एकही आमदार नाही, अशा अन्य पक्षांनाही बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे यातून मुख्यमंत्र्यांची संकुचित मनोवृत्ती आणि डरपोकपणा दिसतो, व्यक्तीगत सूड, द्वेष आणि पोटदुखीतून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला गेल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र जळत आहे तो विझवा आणि जरांगे पाटलांचे प्राण वाचवा. आम्हाला बैठकीला बोलवलं नाही त्यावर आमचं काहीही म्हणणं नाही परंतु या बैठकीतून यावर तोडगा काढायला हवा, असं राऊतांनी म्हटलं आहे.

… मग सरकार झोपलयं का? सरकारमध्येच समाजविघातक प्रवृत्तीची लोक

मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं होतं की, मराठा आरक्षणात काही समाज विघातक प्रवृत्ती शिरल्या आहेत. त्यावर राऊत म्हणाले, असं असेल तर मग सरकार झोपलं आहे का? खरं तर सरकारमध्येच समाजविघातक प्रवृत्तीची लोक आहेत. त्यांनीच या महाराष्ट्राला पेटवलं आहे. भ्रष्ट आणि माफिया प्रवृत्तीची लोक या सरकारमध्ये आहेत, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 362
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.