महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर : सर्वधर्म समभावाचा विचार जोपासत देशाच्या एकात्मतेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस पक्षाची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी प्रांताध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झाली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या या कार्यकारिणीमध्ये सचिन गुजर (वरिष्ठ उपाध्यक्ष), प्रशांत दरेकर, ॲड. कैलास शेवाळे, डॉ. एकनाथ गोंदकर, प्रा. हिरालाल पगडाल, मधुकरराव नवले, अजय फटांगरे, अंकुश कानडे, राकेश पाचपुते, बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, संपतराव मस्के, कारलोस साठे, दादा पाटील वाकचौरे, बापूसाहेब काळदाते, बाबासाहेब कांदळकर, मिनानाथ पांडे, प्रकाश भोसले, श्रीनिवास बिहानी, बाबासाहेब गुंजाळ, लताताई डांगे, सचिन गायकवाड व रोहिदास चव्हाण यांच्यावर उपाध्यक्ष पदाचे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ॲड. माणिकराव मोरे, ज्ञानेश्वर वाफारे, योगेश भोईटे, रवींद्र गायकवाड, सतीश मखरे, अभिजीत लुलिया, अशोक कानडे, विक्रांत दंडवते, श्रीकांत मापारी, ज्ञानेश्वर झडे, उत्तम डाके, सतीश बोर्डे, मुजफ्फर शेख, अशोक हजारे, विश्वास मुर्तडक, डॉ. दिलीप भोस, भारत भवर, कैलास पठारे, सुनील शिंदे, कुंडल राळेभात, जयंत वाघ, महादेव कोकाटे, ॲड. त्रिंबक गडाख, आरिफ तांबोळी, सतीश भांगरे, फैयाज तांबोळी, सुषमाताई भालेराव, प्रतापराव देवरे, आप्पासाहेब डावखर, अशोक वाळुंज, भीमराव नलगे, दादा पाटील आढाव, पंढरीनाथ पवार, भानुदास बोराटे, रंजन जाधव, महेंद्र संत, सुमित शेळके यांची सरचिटणीसपदी तर बाबासाहेब कोळसे, जालिंदर काटे, शामराव वागस्कर ,विष्णुपंत खडागळे, मुबारक बादशहा यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधून 42 कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. कायम निमंत्रित सदस्यांमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे आजी-माजी अध्यक्ष, पक्षाचे आजी-माजी मंत्री लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रदेश कमिटीचे पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष यांचा समावेश आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी अभिनंदन केले आहे.



