Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुष्काळ जाहीर करण्यासाठी तालुक्याऐवजी गाव हा निकष हवा! अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावात दुष्काळ : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
महाराष्ट्र संवाद विशेष

दुष्काळ जाहीर करण्यासाठी तालुक्याऐवजी गाव हा निकष हवा! अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावात दुष्काळ : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/11/2023Updated:09/11/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळ पडला आहे. मात्र तालुके दुष्काळी जाहीर झाल्याने अशा गावांना त्याचा लाभ मिळणार नाही. अनेक गावे योजनांपासून वंचित राहतील. दुष्काळी भागातील शेतकरी वंचित राहू नये, यासाठी दुष्काळाचे मूल्यमापन करताना तालुक्याऐवजी गाव हा निकष करावा, अशी मागणी नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.

डॉ. तांबे म्हणाले, नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र येथे दुष्काळ जाहीर झाला नाही. खरिपाची पिके वाया गेली. रब्बीच्या पेरण्यांमध्ये अडचणी आहे. नैसर्गिक आपत्ती, बदलते वातावरण या सगळ्या बाबींमुळे शेतकरी सातत्याने संकटात सापडत आहे. समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या शेतकऱ्यांना संकट काळात राज्यकर्त्यांनी आधार देण्याची आवश्यकता असते.

संपूर्ण पावसाळा संपला मात्र राज्यभरात पुरेसा पाऊस यावर्षी झाला नाही. परिणामी पेरण्या वाया गेल्या. आत्ताच्या घडीचा विचार केला तर अनेक गावात रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. गावागावांत पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे आहे. पिण्याचे पाणी नसल्याने दुग्ध व्यवसाय, पशुपालन या सगळ्या बाबी अडचणीत आल्या आहेत.

या सगळ्या गोष्टीचा विचार करता शासनाकडून शेतकऱ्यांना दुष्काळी योजनांचा लाभ मिळणे गरजेचे असते. शासनाने नुकतेच दुष्काळग्रस्त तालुके जाहीर केले आहेत, मात्र अनेक गावांमध्ये दुष्काळ असूनही तालुका हा निकष असल्याने दुष्काळग्रस्त जाहीर न झालेल्या तालुक्यातील अनेक दुष्काळी गावांना त्याचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळात एका तालुक्यामध्ये काही भागात चांगली स्थिती असते, तर काही भागात दुष्काळ असतो. त्यामुळे तालुका हा निकष दुष्काळ जाहीर करण्याला योग्य नाही.

दुष्काळाचा लाभ द्यायचा असेल तर थेट गाव पातळीवरचे निकष महत्त्वाचे आहेत. गाव पातळीवर दुष्काळी निकष ठेवला तर कोणताही शेतकरी किंवा कोणतेही गाव दुष्काळी योजनांपासून वंचित राहणार नाही. त्यामुळे प्रामुख्याने दुष्काळी निकष बदलून ते तालुक्याऐवजी गाव करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 621
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.