महाराष्ट्र संवाद न्यूज
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले असून बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते.
बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे –
???? अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.
???? झोपडीधारकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्यात आली आहे.
???? राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान राबविण्याचा निर्णय़ झाला आहे. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.
???? मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करण्यात येणार आहे.
???? मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली आहे.
???? औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशाना सुधारित सेवानिवृत्तीवेतन देण्यात येणार आहे.
???? महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करण्यात येणार आहे.
???? शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे.

