Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी पालिकेने दिलेल्या प्रस्तावास मान्यता मिळावी याबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह शहीद नामदेव जाधव यांच्या स्मारकासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
महाराष्ट्र संवाद विशेष

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी पालिकेने दिलेल्या प्रस्तावास मान्यता मिळावी याबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह शहीद नामदेव जाधव यांच्या स्मारकासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

निधीची केली मागणी, मुख्यमंत्री सकारात्मक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/12/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – दि. ९ डिसेंबर

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संगमनेर बसस्थानकावर बसविण्यात यावा, यासाठी नगरपालिकेने दिलेल्या प्रस्तावास मंजुरी द्यावी. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्याठिकाणी सुशोभीकरणासाठी, विश्वयुध्दात सहभागी असलेले व व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त शहीद नामदेवराव जाधव यांच्या स्मारकास प्रत्येकी १ कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा, यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. यासंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तांबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले.

आमदार तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीमुळे काँग्रेसचे पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह वैभवशाली स्मारके होण्याचा मार्ग सुकर होणार असून यामुळे संगमनेर शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी या निधीची मागणी केली. यावेळी त्यांच्या समवेत युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा, माजी नगरसेवक शैलेश कलंत्री, मिलिंद औटी यांच्यासह विविध सहकारी उपस्थित होते.

संगमनेर शहरातील मध्यवर्ती असलेल्या हायटेक बस स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपालिकेने एसटी महामंडळाला जागा देण्यासाठी प्रस्ताव दिला असून ही जागा तात्काळ मिळावी.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारून त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा.

याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या सर्व तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ विश्व युद्धात सहभागी झालेले व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त शहीद नामदेवराव जाधव यांच्या स्मारकास एक कोटींचा निधी मिळावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा, फुले शाहू आंबेडकर स्मारक, संविधान प्रतिमा याचबरोबर शंभर फुटी तिरंगी झेंड्याची प्रतिकृती साकारणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 746
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar11/09/20260

आजचे राशिभविष्य- मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि ऊर्जादायी ठरेल. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळण्याची…

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.