Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अनैतिक संबंधातून त्याला जाळून मारले, दोघांना अटक; अर्धवट जळालेल्या अवस्थेत घाटात सापडला होता मृतदेह
गुन्हेगारी

अनैतिक संबंधातून त्याला जाळून मारले, दोघांना अटक; अर्धवट जळालेल्या अवस्थेत घाटात सापडला होता मृतदेह

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/12/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा करण्यात पोलीस यशस्वी झाले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी मृताच्या जावयासह आणखी एकाला अटक केली असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकुर जवळील घाटामध्ये १६ डिसेंबरला फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. त्यावेळी ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासा झाला नव्हता. हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला होता. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यापासून खून करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेरीस या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

 

गोरख दशरथ बर्डे ( वय ४८, रा. मिरपुर, लोहारे, तालुका संगमनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून दिनेश शिवाजी पवार (रा. वडगाव कांदळी ता. जुन्नर) आणि विलास पवार (रा. पेमदरा, ता. जुन्नर जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. यातील दिनेश पवार हा मृताचा जावई असून विलास पवार हा शेजारी राहणारा आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

आरोपींच्या पत्नीशी मयताचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्यांना होता. त्यावरून त्यांनी त्याला माळवाडी येथे एका नातेवाईकाच्या लग्नात वरातीला बोलवून त्याचा खून केला व ओळख पटू नये म्हणून ज्वलनशील पदार्थ टाकून त्याचा चेहरा आणि शरीराचा काही भाग जाळण्यात आला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

जांभूळवाडी शिवारात वनविभागाच्या जागेत या व्यक्तीचा मतभेद आढळून आल्यानंतर रणखांब गावचे पोलीस पाटील साहेबराव बाबुराव बारवे यांनी यासंदर्भात घारगाव पोलीस ठाण्यात माहिती देऊन त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये अज्ञात व्यक्ती मयत झाल्याची नोंद करण्यात आली होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,612
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

By Annant Ppangarkar05/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- गणेशोत्सवाच्या तोंडावर वर्गणीच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. पुढच्या…

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.