Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
गुन्हेगारी

वीज चोरी पकडणाऱ्या कंत्राटी वायरमनने मागितली ५० हजारांची लाच! गुन्हा दाखल, वायरमन अटकेत; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

लाचलुचपत विभागाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. तसेच सखोल तपास करण्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर:

संगमनेर तालुक्यातील निंबाळे शिवारात वीज चोरी प्रकरणावरून हॉटेल चालकाकडे ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कंत्राटी वायरमनला नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. गणेश माधव दातीर (रा. पिंप्रीलौकी, ता. संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर वायरमनचे नाव आहे. या कारवाईनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश विवेक गव्हाणे यांनी आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई काल (शुक्रवार ५ जून) दुपारी १ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हेवाडी रोड परिसरातील एका नामांकित हॉटेलला मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा लागतो. या हॉटेल चालकाने विजेचे पैसे वाचवण्यासाठी डीपीवरून चोरून वीज वापरण्यास सुरुवात केली होती. ही वीज चोरी कंत्राटी वायरमन गणेश दातीर याने पकडली. वीज चोरी पकडल्यानंतर दातीर याने हॉटेल चालकाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि मोठ्या कारवाईची भीती दाखवली. कारवाई टाळण्यासाठी हॉटेल चालकाने प्रकरण तिथेच मिटवण्याची तयारी दर्शवली. याचाच गैरफायदा घेत वायरमन दातीर याने ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

हॉटेल चालकाची चोरलेली वीजजोडणी आणि वायर आधीच काढून घेण्यात आली असल्याने, मग पैसे कशासाठी द्यायचे, असा विचार करून त्यांनी सुरुवातीला पैसे देण्याचे टाळले. मात्र, लाचखोर दातीर याने हॉटेल चालकाकडे पैशांसाठी वारंवार तगादा लावला. तो कधी थेट हॉटेलवर जाऊन तर कधी फोन करून सतत मानसिक त्रास देऊ लागला. दातीर याच्या या सततच्या त्रासाला आणि वाढत्या मागणीला वैतागून अखेर हॉटेल चालकाने थेट नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.

तक्रारदाराच्या अर्जाची शहानिशा केल्यानंतर नगर लाचलुचपत विभागाचे पथक आज दुपारी संगमनेरात दाखल झाले. लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. या धक्कादायक कारवाईमुळे संगमनेर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या धडक कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी गणेश दातीर याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, लाचलुचपत विभागाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. तसेच सखोल तपास करण्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश विवेक गव्हाणे यांनी आरोपी गणेश दातीर याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 804
अहिल्यानगर लाचलुचपत विभाग एसीबी अहिल्यानगर कंत्राटी वायरमन पोलीस कोठडी लाचखोरी लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: आगामी गणेशोत्सव भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार…

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.