Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये दरोडा टाकणाऱ्या संघटित टोळीवर ‘भारतीय न्याय संहिता’ कलम १११ अन्वये मोठी कारवाई; अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचे आदेश

जेव्हा आरोपींनी एकत्रितपणे मिळून दोन किंवा अधिक गुन्हे केले असतील, तेव्हा हे कलम लावण्याची परवानगी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून दिली जाते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/06/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर:

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक दाखवून पिकअप वाहनावरील चालकाला मारहाण करत ९५,५०० रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध पोलिसांनी अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून सातत्याने गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांच्यावर नवीन कायद्यानुसार ‘भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३’ चे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली असून, या टोळीचा म्होरक्या अक्षय दादा चव्हाण याच्यासह त्याच्या पाच साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास संगमनेरमधील डी-मार्ट जवळ ही घटना घडली होती. फिर्यादी शैलेश नारायण शेलार (वय ३४, रा. खैरेवाडी, ता. निफाड, जि. नाशिक) हे आपल्या मालवाहू पिकअप वाहनामधून कंपनीचा माल घेऊन नाशिकहून चेन्नईच्या दिशेने जात होते. दरम्यान, सायखिंडी फाटा आणि डी-मार्टच्या मध्ये नाशिक-पुणे हायवेवर अज्ञात सहा इसमांनी स्वतःच्या चारचाकी वाहनाने फिर्यादीच्या पिकअपला आडवे लावून रस्ता अडवला. त्यानंतर आरोपींनी आरडाओरडा करत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून वाहनातील ९५,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने लुटून नेला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३६४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपासादरम्यान या गुन्ह्यात एकूण सहा आरोपी निष्पन्न झाले असून, त्यामध्ये टोळीप्रमुख अक्षय दादा चव्हाण (वय २१, रा. अकोले नाका, संगमनेर), रोहित उर्फ कोकण भिकाजी शिंदे (वय २५, रा. अकोले नाका, संगमनेर), संदिप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (वय २५, रा. आठरापगड, गुंजाळवाडी, ता. संगमनेर), आदित्य संजय शिंदे (वय २१, रा. आठरापगड, गुंजाळवाडी, ता. संगमनेर), अभिषेक अशोक लोंढे (वय २२, रा. अकोले नाका, संगमनेर) आणि साई रामपुरी गोसावी (वय २४, रा. अकोले नाका, संगमनेर) यांचा समावेश आहे. यापैकी पहिल्या चार आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली असून त्यांचे गुन्हेगारी अभिलेख तपासण्यात आले आहेत.

पोलिसांनी या सर्व आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी केली असता, या टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची धक्कादायक मालिका समोर आली आहे. टोळीप्रमुख अक्षय चव्हाण याच्यावर ८ गंभीर गुन्हे, रोहित उर्फ कोकण शिंदे याच्यावर ६ गुन्हे, तर संदिप उर्फ जब्या वाल्हेकर याच्यावर तब्बल १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आदित्य शिंदे याच्यावर ३ गुन्हे, अभिषेक लोंढे याच्यावर २ गुन्हे आणि साई गोसावी याच्यावर ४ गुन्हे दाखल आहेत.

या टोळीने बेकायदेशीर मार्गाने वित्तीय आणि भौतिक लाभ मिळवण्यासाठी संगमनेर शहर परिसरात दहशत निर्माण केली होती. त्यांच्यावर दरोडा, शस्त्रांचा वापर करून जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, दिवसा व रात्री घरफोडी करणे, अनाधिकृत गृहप्रवेश आणि खुनाचा प्रयत्न करणे यांसारखे एकूण ३० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

या गुन्हेगारांच्या सातत्यपूर्ण कृत्यांमुळे संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांनी या टोळीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) समाविष्ट करण्याचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे पाठवला होता. वाघचौरे यांनी या प्रस्तावाचे सखोल अवलोकन करून, आरोपींनी संघटित टोळी बनवून गुन्हेगारी कृत्ये केल्याचे स्पष्ट झाल्याने या वाढीव कलमाच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे.

नवीन कायद्यातील कलम १११ हे पूर्वीच्या ‘मोक्का’ कायद्याप्रमाणेच संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नव्याने समाविष्ट करण्यात आले असून, यामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद आहे. जेव्हा आरोपींनी एकत्रितपणे मिळून दोन किंवा अधिक गुन्हे केले असतील, तेव्हा हे कलम लावण्याची परवानगी पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून दिली जाते.

ही धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,302
कलम १११ बीएनएस कलम 111 सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: आगामी गणेशोत्सव भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार…

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.