Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये वृद्ध शेतकऱ्याला भरदुपारी लुटले; पावणेदोन लाखांच्या रोकडसह धनादेश लंपास

बाबा, तुमचे पैसे आणि मोबाईल खाली पडला आहे, असे सांगून त्यांनी शेटे यांचे लक्ष विचलित केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:

बँकेतून पैसे काढून घराकडे चाललेल्या एका वृद्ध शेतकऱ्याचे लक्ष विचलित करून, दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या स्कूटीला लटकवलेली पैशांची पिशवी चोरून नेल्याची धक्कादायक घटना बुधवार, ३ जून रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास सुकेवाडी कुरण रस्त्यावर घडली.

शेतकऱ्याकडील पिशवीत १ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे ३ लाख रुपयांचे सह्या केलेले दोन धनादेश होते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुकेवाडी येथील ६९ वर्षीय शेतकरी सुरेश बाळकृष्ण शेटे यांनी एका व्यवहारापोटी मिळालेल्या तीन धनादेशांपैकी १ लाख ७५ हजार रुपयांचा एक धनादेश येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतून वटवला होता. मिळालेली रोख रक्कम आणि उरलेले दोन धनादेश त्यांनी आपल्या जेवणाच्या डब्याच्या पिशवीत ठेवले. ही पिशवी आपल्या ॲक्टिव्हा स्कूटीच्या हँडलला अडकवून ते कुरण रस्त्याने घराकडे निघाले होते.

रस्त्यावरील एका वळणावर पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी शेटे यांना थांबवले. बाबा, तुमचे पैसे आणि मोबाईल खाली पडला आहे, असे सांगून त्यांनी शेटे यांचे लक्ष विचलित केले. शेटे पाठीमागे पाहू लागताच, चोरट्यांनी हँडलला लटकवलेली पिशवी हिसकावून अवघ्या काही सेकंदात तिथून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शेटे पुरते हादरून गेले.

पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच शेटे यांनी तातडीने संबंधित व्यक्तीला संपर्क साधला आणि बँकेतील व्यवहार थांबवण्यास सांगितले, यामुळे धनादेशांचा गैरवापर टळला आणि पुढील मोठा अनर्थ टळला. चोरट्यांनी बँकेपासूनच पाळत ठेवून हा कट रचल्याचा संशय व्यक्त होत आहे. सुरेश शेटे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मुंढे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,518
गुन्हेगारी शेतकऱ्याला लुटले
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.