Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष… माणुसकीचं नातं..!
महाराष्ट्र संवाद विशेष

रविवार विशेष… माणुसकीचं नातं..!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/12/2023No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

मी अंथरुणातून उठलो, तर अचानक छातीमध्ये दुखू लागले. मला हार्टचा त्रास आहे का? या विचारांमधे मी बैठकीच्या खोलीमध्ये गेलो. मी पाहिलं, तर माझा पूर्ण परिवार मोबाईल बघण्यामधे व्यस्त होता. मी माझ्या पत्नीकडे बघून म्हणालो, “माझ्या छातीमध्ये आज, रोजच्यापेक्षा थोडं जास्त दुखतं आहे, मी जाऊन डॉक्टरांना दाखवून येतो.”

“हो, पण सांभाळून जा, गरज पडली तर फोन करा.” मोबाईलमध्ये बघता-बघताच बायको म्हणाली. बाकी सर्व मंडळी याबाबतीत तर बेखबरच होती.

मी ॲक्टिव्हाची चावी घेऊन पार्किंगमध्ये पोहोचलो. मला खूप घाम येत होता आणि ॲक्टिव्हा स्टार्ट होत नव्हती. त्याचवेळी आमच्या घरी काम करणारा, ध्रुव सायकल घेऊन आला. सायकलला कुलूप लावल्यानंतर मला समोर बघून तो म्हणाला, “काय साहेब, ॲक्टिव्हा चालू होत नाही का?”

मी म्हणालो,”नाही…!!”

“साहेब, तुमची तब्येत ठीक दिसत नाही. इतका घाम का येतो आहे? साहेब, या परिस्थितीमध्ये ॲक्टिव्हाला किक मारू नका, मी किक मारून चालू करून देतो.” ध्रुवने एकच किक मारून ॲक्टिव्हा चालू करून दिली. त्याबरोबरच विचारले, “साहेब,एकटेच जात आहात का?”

मी म्हणालो, “हो.”

तो म्हणाला, “अशा परिस्थितीमध्ये एकटे जाऊ नका. चला, माझ्या मागे बसा.” मी म्हणालो,”तुला ॲक्टिव्हा चालवता येते का ?” “साहेब, माझ्याकडे मोठ्या गाडीचं देखील लायसेंस आहे, काळजी करू नका आणि मागं बसा.” आम्ही जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. ध्रुव पळतच आत गेला आणि व्हीलचेअर घेऊन बाहेर आला, “साहेब, पायी चालू नका, या खुर्चीवर बसा.”

ध्रुवच्या मोबाईलवर सतत रिंग वाजत होती. मी समजून गेलो की, फ्लॅटमधील सगळ्यांचे फोन येत असतील, की तो अजूनपर्यंत का नाही आला?शेवटी कंटाळून ध्रुव कोणाला तरी म्हणाला की,”मी आज येऊ शकत नाही.”

ध्रुव, डॉक्टरांबरोबर ज्या प्रकारे चर्चा करत होता त्यावरून त्याला न सांगताच समजलं होतं, की साहेबांना हार्टचा त्रास आहे. लिफ्टमधून तो व्हीलचेअर ICU कडे घेऊन गेला. माझ्या त्रासाबद्दल ऐकल्यानंतर, डॉक्टरांची टीम तयारच होती. सगळ्या टेस्ट ताबडतोब केल्या.

डॉक्टर म्हणाले, “तुम्ही वेळेवर पोहोचलात आणि त्यातून तुम्ही व्हिलचेअरचा उपयोग करून अधिकच समजूतदारपणाचे काम केले आहेत. आता कोणाचीही वाट बघणं, हे तुमच्यासाठी हानिकारक आहे. यामुळे वेळ न घालवता आम्हाला हार्टच ऑपरेशन करून तुमचे ब्लॉकेजेस लवकरच दूर करावे लागतील. या फॉर्मवर तुमच्या नातेवाईकाच्या हस्ताक्षराची गरज आहे.” डॉक्टरांनी ध्रुवकडे बघितल.

मी म्हणालो, “बेटा, तुला सही करता येते का?”

तो म्हणाला, “साहेब,इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकू नका.”

“बेटा,तुझी काहीही जबाबदारी नाही. तुझ्याबरोबर भले रक्ताचा संबंध नाही, तरीही तू काहीही न सांगता आपली जबाबदारी पूर्ण केलीस. खरंतर, ही माझ्या कुटुंबियांची जबाबदारी होती. एक अजून जबाबदारी पूर्ण कर बेटा. मी खाली हस्ताक्षर करून लिहून देईन, की मला काही झालं, तर ही जबाबदारी माझी आहे. ध्रुवने फक्त माझ्या सांगण्यावरून हस्ताक्षर केलं आहे. कृपा करून आता सही कर… आणि हो, घरी फोन करून सांगून दे.”

त्याचवेळी माझ्या पत्नीचा फोन ध्रुवच्या मोबाईलवर आला. ती काय म्हणत होती, ते त्याने शांतपणे ऐकून घेतले. थोड्या वेळाने ध्रुव म्हणाला, “मॅडम, तुम्हाला माझा पगार कट करायचा असेल तर कट करा, मला काढून टाकायचं असेल तर काढून टाका. परंतु, आत्ता ऑपरेशन सुरु होण्याआधी हाॅस्पिटलमधे पोहचून जा. हो मॅडम, मी साहेबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली आहे आणि त्यांनी सांगितले आहे, की आता वेळ घालवून चालणार नाही.”

मी विचारलं,”बेटा घरून फोन होता का?”

“होय साहेब.”

मी मनात पत्नीविषयी विचार केला… अगं, तू कोणाचा पगार कट करण्याची गोष्ट करत आहेस आणि कोणाला काढून टाकण्याची गोष्ट करत आहेस? अश्रूपूर्ण डोळ्यांनी, मी ध्रुवच्या खांद्यांवर हात ठेवून म्हणालो, “बेटा काळजी करू नकोस. मी ज्या संस्थेमध्ये सेवा देतो, तिथे वृद्ध लोकांना आसरा देतात आणि तिथे तुझ्यासारख्या व्यक्तींची गरज आहे. तुझं काम भांडी धुणे… कपडे धुणे… हे नाही. तर तुझं काम समाजसेवा करण्याचे आहे. बेटा, तुला पगारही मिळेल, त्याबद्दल चिंता बिलकुल करू नकोस.”

ऑपरेशननंतर मी शुद्धीवर आलो. माझ्यासमोर माझे सर्व कुटुंबीय मान खाली घालून उभे होते. मी पाणावलेल्या डोळ्यांनी विचारले, “ध्रुव कोठे आहे?

पत्नी म्हणाली, “तो आताच सुट्टी घेऊन गावी गेला. म्हणत होता, की त्याच्या वडीलांचे हार्टअटॅकने निधन झाले आहे. पंधरा दिवसानंतर तो परत येईल.”

आता मला समजलं, की त्याला माझ्यामध्ये आपले वडिल दिसत असावेत. हे देवा! त्याला हिम्मत दे.

संपूर्ण कुटुंबीय हात जोडून, शांतपणे, मान खाली घालून माझी माफी मागत होते. मोबाईलचं व्यसन, एका व्यक्तीला आपल्या हृदयापासून, आपल्या परिवारापासून, आपल्या अस्तित्वापासून किती दूर घेऊन जाते.

डॉक्टरांनी येऊन विचारलं, “सगळ्यात प्रथम मला हे सांगा, ध्रुव तुमचे कोण लागतात?” मी म्हणालो, “डॉक्टर साहेब, काही नात्यांच्या संबंधाविषयी किंवा त्यांची खोली न मोजणं हे केंव्हाही चांगलं. अशामुळे त्या नात्याचे मोठेपण तसचं राहील, फक्त मी इतकंच म्हणेन, की तो माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासाठी देवदूत बनून आला होता.”

पिंटू म्हणाला, “आम्हांला माफ करा बाबा. जे आमचं कर्तव्य होतं, ते ध्रुवने पूर्ण केलं, ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. इथूनं पुढे अशी चूक भविष्यामध्ये कधीही होणार नाही.”

“बेटा, आम्ही सर्वजण आज टेक्नॉलॉजीमध्ये इतके गर्क झालो आहोत, की आपल्या आसपासच्या लोकांचा त्रास देखील आपल्याला जाणवत नाही. एका निर्जीव खेळण्याने जिवंत माणसाला गुलाम बनवून ठेवलं आहे. आता वेळ आली आहे, की त्याचा उपयोग मर्यादित स्वरूपात करावा. नाहीतर… परिवार, समाज आणि राष्ट्रालाच नाही तर संपूर्ण विश्वाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि त्याची किंमत चुकविण्यासाठी तयार रहावे लागेल.”

“स्वतःला सत्याबरोबर जोडा, आणि जे असत्य आहे, ते आपोआपच गळून पडेल .”

अनामिक – साभार समाज माध्यम

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 314
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.