Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी काँग्रेसच्या शहराध्यक्षासह नगरसेवकावर महसूलमंत्र्यांच्या लोणीत प्राणघातक हल्ला; आमदार बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात घेतली भेट
महाराष्ट्र संवाद विशेष

शिर्डी काँग्रेसच्या शहराध्यक्षासह नगरसेवकावर महसूलमंत्र्यांच्या लोणीत प्राणघातक हल्ला; आमदार बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात घेतली भेट

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/01/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर : काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर राहाता तालुक्यातील लोणी येथे मंगळवारी संध्याकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत संगमनेरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन या दोघांची भेट घेतली.

मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री विखे यांच्या मतदारसंघातील आश्वीमध्ये आरपीआय नेते गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हे दोघे उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिर्डीकडे परतत असताना लोणी मध्ये चौगुले व आरणे यांची गाडी अडवत सात-आठ हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने मारहाण करत हल्ला चढविला.

हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने संगमनेर मधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू केला असून वाहन ताब्यात घेतले आहे.

दरम्यान आल्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी हा हल्ला राजकीय वैमनस्त्यातून झाल्याचे बोलले जाते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अशाप्रकारे राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीला भर रस्त्यात गाठून त्यांच्यावर हल्ला केला जात असल्याने या हल्ल्यामागील सूत्रधार आणि हल्लेखोर शोधण्याची मागणी होत आहे.

रुग्णालयात जखमींची भेट घेत आमदार बाळासाहेब थोरातांनी केली ही मागणी…

हल्ल्याची माहिती मिळताच काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन चौगुले व आरणे यांच्या प्रकृतीची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी रुग्णालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान हल्ल्याची घटना हे दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,232
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.